solapur bajar samiti Election  sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर बाजार समिती निवडणूक! पहिल्याच दिवशी ११ जणांचे १२ अर्ज दाखल; २५० इच्छुकांनी नेले उमेदवारी अर्ज; माजी सभापती शिवदारे, हसापुरे, पाटील यांचा समावेश

सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी ११ जणांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. माजी सभापती राजशेखर शिवदारे, माजी उपसभापती सुरेश हसापुरे, माजी संचालक वसंत पाटील प्रमुख मान्यवरांचा यात समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (ता. २५) ११ जणांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. माजी सभापती राजशेखर शिवदारे, माजी उपसभापती सुरेश हसापुरे, माजी संचालक वसंत पाटील प्रमुख मान्यवरांचा यात समावेश आहे. सोमवारी (ता. २४) बाजार समितीच्या निवडणुकीच्या स्थगित झालेल्या प्रक्रियेला सुरवात झाली. शुभ दिवस असल्याने माजी सभापती शिवदारे, माजी उपसभापती हसापुरे, माजी संचालक पाटील यांच्यासह एकूण ११ जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याकडे अर्ज दाखल केले.

हसापुरे यांचे दोन गटातून अर्ज

माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांनी सहकारी संस्था सर्वसाधारण व इतर मागासवर्ग अशा दोन गटांतून अर्ज दाखल केला आहे. ते बाहेर असल्याने अनुक्रमे सूचक काशिनाथ गोटे, महादेव फुलारी यांनी त्यांचे अर्ज दाखल केले. भंडारकवठ्याचे माजी संचालक वसंत पाटील यांनी सहकारी संस्था सर्वसाधारण तर त्यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील यांनी सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून अर्ज भरला आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दुर्बल, अशा तिन्ही गटांतून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

निवडणुकीसाठी २५० जणांनी नेले अर्ज;

अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपर्यंत मुदत

सोमवारी २५० जणांनी उमेदवारी अर्ज नेले. मागील प्रक्रियेवेळी ऑक्टोबरमध्ये १८१ जणांनी उमेदवारी अर्ज नेले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवार (ता. २८) पर्यंत मुदत आहे.

मतदारसंघनिहाय दाखल उमेदवारी अर्ज

  • सहकारी संस्था सर्वसाधारण : सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, शिवानंद बगले पाटील (कुडल), राजशेखर सगरे (बंकलगी), वसंत पाटील (भंडारकवठे), सुरेश कराळे (देगाव), श्रीशैल पाटील (तेलगाव).

  • सहकारी संस्था महिला राखीव : माहेश्‍वरी बिराजदार (निंबर्गी).

  • सहकारी संस्था इतर मागासवर्ग : सुरेश हसापुरे

  • सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती : प्रथमेश पाटील (भंडारकवठे).

  • व्यापारी प्रतिनिधी : अरुणा होसमठ (शेळगी).

  • हमाल तोलार प्रतिनिधी : गफ्फार चांदा (सोलापूर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT