bjp and congress sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर बाजार समिती निवडणूक! विजय मालकांचा नकार, सचिन दादांची एन्ट्री अन्‌ सुभाष बापू एकाकी; बळीराम साठे आज घेणार निर्णय; सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे या तरुण आमदारांच्या माध्यमातून युती केली आहे. भाजप आमदारांच्या नव्या डावपेचामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. पहिल्यापासून ‘पक्ष म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी लढणार’ या भूमिकेवर ठाम असलेले आमदार सुभाष देशमुख एकाकी पडले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे या तरुण आमदारांच्या माध्यमातून युती केली आहे. भाजप आमदारांच्या नव्या डावपेचामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. पहिल्यापासून ‘पक्ष म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी लढणार’ या भूमिकेवर ठाम असलेले आमदार सुभाष देशमुख एकाकी पडले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांना काँग्रेस नेत्यांनी बैठकीला न बोलावून मोठा धक्का दिला आहे. उद्या (मंगळवारी) ते भूमिका स्पष्ट करणार आहेत.

भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे अक्कलकोटचे आमदार कल्याणशेट्टी यांच्या भूमिकेची वाट पहात होते. पण, त्यांनी सोमवारी (ता. १४) काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून बाजार समिती निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्ही निवडणुकीत उतरतोय, असे सांगितले. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांना काहीच बोलता आले नाही.

पण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेत्यांच्या निवडणुका संपल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका सुरू असून नेत्यांनी त्यांच्यासाठी परिश्रम घ्यावे, असे म्हटल्याचा दाखला देत भाजप कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. दरम्यान, आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला हजेरी लावत भूमिका स्पष्ट केल्यावार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीची आठवण सर्वांनाच झाली.

काँग्रेसोबत युती अमान्य; आम्ही ‘राष्ट्रीय बाजार’वर ठाम

शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री जयकुमार रावळ यांची भेट घेऊन सोलापूर बाजार समिती राष्ट्रीय बाजार करावी, अशी मागणी केली आहे. आपली ताकद नसल्याने आपण बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलो नाही, पण कोणी स्वार्थासाठी कोणासोबतही जात असेल ते आम्हाला मान्य नाही. मुख्यमंत्र्याकडून आम्हाला तर काँग्रेससोबत युती करा, असे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत नाही, असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले.

कोणी बोलावले नाही, आज निर्णय घेणार

बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीसाठी आपल्याला कोणी बोलावले नाही. कोणी त्यासंबंधीचा निरोप देखील दिला नाही. उद्या (मंगळवारी) बघायचे काय होतंय, तेव्हा निर्णय घेणार आहे.

- बळीराम साठे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

------------------------------------------------------------------------------------

निवडणुकीसंदर्भातील आमची भूमिका कार्यकर्त्यांनाच विचारा

कोणकोणासोबत गेले मला माहिती काहीच नाही, मी सामान्य माणूस आहे. कार्यकर्त्यांसाठी मी पक्ष म्हणून लढतोय. बाजार समिती निवडणुकीसंदर्भातील भूमिका कार्यकर्त्यांना विचारा.

- सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर

---------------------------------------------------------------------------

माझ्यासोबत कोणी काहीही चर्चा केलेली नाही

मी सोलापुरात नाही, सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात कोणी आपल्यासोबत चर्चा केली नाही. कोणाची कोणासोबत युती झाली याबद्दल मला माहिती नाही.

- सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

Mangalwedha News : मंगळवेढा नगरपालिकेची प्रभाग रचना झाली प्रसिद्ध; अशी असेल रचना

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

SCROLL FOR NEXT