महाराष्ट्र

स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळांचे अनुदान रद्द

विजयकुमार सोनवणे
आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य सरकारने घेतला निर्णय
सोलापूर - राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या राज्यातील 100 शैक्षणिक संस्थांना विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. अर्थ विभागाने दिलेल्या अभिप्रायानंतर सरकारने हा निर्णय घेतला. या शाळांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे विशेष अनुदान देण्याचा शासन आदेश 3 मार्च 2014 रोजी घेतला होता. तो निर्णय रद्द करण्यात आला असून, तसा शासनआदेश नुकताच जारी झाला.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून शाळेची गुणवत्ता राखून ठेवणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रजी शाळा वगळून अन्य माध्यमांच्या शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी हा निर्णय झाला होता. निश्‍चित केलेले निकष, ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे राज्यातील 100 शाळांची निवड करण्यात आली होती. पात्र शाळांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे विशेष अनुदान दिले जाणार होते. सरकारने अर्थ विभागाचा अभिप्राय मागविला. त्या वेळी, राज्याची सध्याची आर्थिक स्थिती, गरजा व त्यांचा प्राधान्यक्रम लक्षात घेता या 100 शाळांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे शक्‍य होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील या शाळांना प्रत्येकी दहा लाखांचे विशेष अनुदान देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

या शाळांची विशेष आर्थिक मदत झाली रद्द
- उत्तर मुंबई - कुर्ला बॉईज हायस्कूल, कुर्ला आणि हिंदी हायस्कूल, घाटकोपर
- पश्‍चिम मुंबई - पार्ले टिळक मराठी हायस्कूल आणि डॉ. एम.आय.जे. हायस्कूल, मुंबई
- दक्षिण मुंबई - सेंट कोलंबा हायस्कूल, ह्यूम हायस्कूल आणि मराठा हायस्कूल, मुंबई

-रायगड - एस. ए. हायस्कूल व म. ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालय, मुरूड, विठोबा खंडाप्पा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पनवेल आणि प्रायव्हेट हायस्कूल, पेण.
- ठाणे - थॉमस बाप्टिस हायस्कूल, वसई, सुभेदार वाडा आय. कल्याण, एम.एच. मराठी हायस्कूल, ठाणे.

- कोकण - चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूल, मुंबई

-नाशिक - जे. एस. रुंगठा हायस्कूल, नाशिक, मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय, मनमाड, ए.टी.टी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव.
धुळे - पी. बी.एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल, शिरपूर आणि जे. आर. सिटी हायस्कूल व कमलाबाई हायस्कूल, धुळे

नंदुरबार - न्यू इंग्लिश स्कूल, शहादा, के. डी. हायस्कूल, तळोदे, सार्वजनिक हायस्कूल, नंदुरबार

जळगाव - सेंट अलांयसेस हायस्कूल, भुसावळ, सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, यावल, ए. बी. मुलांचे हायस्कूल चाळीसगाव, पी. आर. हायस्कूल, जळगाव.

पुणे - गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डेक्कन जिमखाना पुणे, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड पुणे, राजा रघुनाथराव विद्यालय, भोर, पुणे.

सोलापूर - शहाजी हायस्कूल, अक्कलकोट, आपटे उपलप प्रशाला पंढरपूर आणि सेवासदन प्रशाला सोलापूर.

नगर - सर डी.एम. पेटिट हायस्कूल, संगमनेर, भाउसाहेब फिरोदिया हायस्कूल, नगर आणि त्रिलोक जैन विद्यालय, पाथर्डी.

कोल्हापूर - प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूर, गोविंदराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोल्हापूर, विद्यापीठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोल्हापूर.

सातारा - मुधोजी हायस्कूल, फलटण, श्री श्री विद्यालय, औंध, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा.

सांगली - मिरज हायस्कूल, मिरज, सांगली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सांगली, श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जत.

रत्नागिरी - पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी, राजापूर हायस्कूल, राजापूर, माखजन इंग्लिश स्कूल, माखजन.

सिंधुदुर्ग - टोपीवाला हायस्कूल, मालवण, बावडेकर विद्यालय, शिरोडा, कुडाळ हायस्कूल, कुडाळ.

औरंगाबाद - श्री सरस्वती भुवन प्रशाला, शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद. मराठा हायस्कूल, चौराहा.

जालना - एम. एस. जैन हायस्कूल, जालना.

बीड - श्री योगेश्‍वरी नूतन विद्यालय, अंबाजोगाई, वैद्यनाथ विद्यालय, परळी, चंपावती विद्यालय, नगर रोड बीड.

हिंगोली - जिल्हा परिषद प्रशाला, गोरेगाव.

परभणी - कै. रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, परभणी, श्रीमती ल. ला. नूतन कन्या प्रशाला, सेलू आणि नूतन विद्यालय,सेलू, जिल्हा परिषद हायस्कूल, फुलंब्री.

लातूर - जिल्हा परिषद हायस्कूल, साकोळ, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, लातूर.

नांदेड - प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कैलासनगर.

उस्मानाबाद - श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गुंजोटी, भारत विद्यालय, उमरगा, श्री शांतेश्‍वर विद्यालय, सास्तूर.

नागपूर - सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल, नागपूर, डी.डी.नगर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कळमेश्‍वर, नागपूर, भिडे मुलींचे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर.

भंडारा - नूतन कन्याशाळा, भंडारा, माजी शासकीय लालबहादूर शास्त्री उच्च माध्यमिक शाळा, भंडारा, नगर परिषद विद्यालय, पवनी.

गोंदिया - गुजराथी नॅशनल हायस्कूल, गोंदिया, शहीद मिश्रा हायस्कूल, तिरोडा.

अमरावती - नीरीमाला हायस्कूल, अमरावती, जिल्हा परिषद हायस्कूल, सायन्स कोर, अमरावती, धामणगाव रेल्वे से.फ.ला. हायस्कूल, धामणगाव रेल्वे, न्यू इंग्लिश हायस्कूल, वरूड अमरावती.

अकोला - तुळसाबाई कावल विद्यालय, पातूर, सेठ बन्सीधर विद्यालय, तेल्हारा, न्यू इंग्लिश स्कूल, अकोला.

वाशीम - राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा (पूर्वीचे ताराबाई कन्या शाळा, वाशीम).

बुलडाणा - सी. एस. कोठारी (मुले) हायस्कूल, नांदुरा, गो. वि. महाजन विद्यालय, मलकापूर, अंजुमन उर्दू हायस्कूल, खामगाव.

यवतमाळ - जिल्हा परिषद शासकीय माध्यमिक शाळा, यवतमाळ, व्ही.बी.जी. हायस्कूल, दारव्हा आणि दिनाबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, दिग्रस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT