महाराष्ट्र

दूध खरेदी दरात चार रुपये कपात

सकाळवृत्तसेवा
सोलापूर - राज्य शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २७ रुपयांचा खरेदी दर याआधीच जाहीर केला आहे. त्याच्या अंमलबजावणीबाबत सहकारी दूध संघांकडून चालढकल सुरू असताना, आता खासगी दूध संघांनी मात्र थेट प्रतिलिटर २३ रुपयांपर्यंतचा दूध खरेदी दर स्वतःच ठरवून घेतला आहे. त्याची अंमलबजावणी घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू केली आहे, विशेष म्हणजे खासगी दूध संघांच्या या निर्णयावर शासनाकडून अद्याप कोणताच हस्तक्षेप झालेला नाही. शिवाय, खासगी संघांनंतर आता सहकारी संघही याच मनःस्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडण्याची चिन्हे आहेत.

खासगी संघाच्या पुण्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात सर्वाधिक सुमारे ३५ ते ४० लाख लिटर दूधसंकलन खासगी संघाकडे आहे. त्यापाठोपाठ १२ ते १५ लाख लिटर दूध सहकारी संघ खरेदी करते. चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनावेळी दूध दराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्या वेळी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी गाईच्या ३.५ ते ८.५ फॅटच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ३८ रुपये दर जाहीर केला होता; पण त्यानंतर काही मोजक्‍या संस्था आणि संघ वगळता, अन्य संस्थांनी हा वाढीव दर देण्याबाबत चालढकल केली. दुधाची वाढलेली आवक आणि कमी मागणी, त्यात दूध पावडरचे उत्पादन आणि विक्रीतील अडचणीचे अनेक मुद्दे पुढे करण्यात आले.

गेल्या आठवड्यात अकलूजमध्ये राज्यातील सहकारी दूध संघांच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. त्यात सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींनी दूध संघ आणि शेतकऱ्यांना सरकारकडून थेट अनुदान देण्याची मागणी केली. त्यानंतर आता खासगी दूध संघांनी अशा पद्धतीची बैठक घेऊन दुधाचा स्वतःचा दरच ठरवून टाकला आहे. त्यानुसार आता २३ रुपये दरानुसार गाईच्या दुधाची खरेदी खासगी संघांकडून होणार आहे. अर्थात, खासगी दूध संघांवर शासनाची कोणतीच बंधने नाहीत. त्यामुळे त्यांना मोकळीक आहे; पण सहकारी संघांवर मात्र बंधने आहेत; पण खासगी संघाच्या या निर्णयानंतर सहकारी संघही त्याच मनःस्थितीत आहेत.

खासगी संघांना बंधन नसल्याने ते निर्णय घेऊ शकतात. सध्या आमचा दर हा २७ रुपयेच आहे; पण दुधाची आवक आणि बाजारातील परिस्थिती याचा विचार करता, आम्हालाही काही निर्णय घ्यावा लागेल. दूध संस्थांना थेट अनुदान देण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे; पण अद्याप निर्णय झालेला नाही.
- सतीश मुळे, व्यवस्थापक संचालक, सोलापूर जिल्हा दूध संघ

बाजारात दुधाला उठावच नाही, काय करणार? दुधाच्या प्रक्रियायुुक्त पदार्थांनाही मागणी कमी आहे. त्यात जीएसटीमुळेही आम्ही अडचणीत आलो आहोत. यापुढेही अशीच स्थिती राहिली, तर आणखी एखादा रुपया कमीही होऊ शकतो.
- दशरथ माने, सोनाई दूध संघ, इंदापूर, जि. पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT