madar film

 

solapur

महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या सुपूत्राच्या ‘मदार’ चित्रपटाने पाणावले डोळे! पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, फ्रान्सच्या ‘कान्स’ महोत्सवात कौतूक, वाचा...

दुष्काळाची भीषणता, पाण्यासाठी दाहीदिशा होणारी भटकंती आणि त्यातून उभं ठाकलेलं अस्तित्वाचं संकट... या साऱ्या वेदना जेव्हा रुपेरी पडद्यावर उमटल्या, तेव्हा उपस्थित सोलापूरकरांच्या मनाचा ठाव सुटला. सोलापूर फिल्म सोसायटी आणि परिवर्तन अकादमी यांच्या वतीने आयोजित 'मदार' या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनात सोलापूरकरांचे पाणावलेले डोळे खूप काही बोलून गेले.

तात्या लांडगे

सोलापूर : दुष्काळाची भीषणता, पाण्यासाठी दाहीदिशा होणारी भटकंती आणि त्यातून उभं ठाकलेलं अस्तित्वाचं संकट... या साऱ्या वेदना जेव्हा रुपेरी पडद्यावर उमटल्या, तेव्हा उपस्थित सोलापूरकरांच्या मनाचा ठाव सुटला. सोलापूर फिल्म सोसायटी आणि परिवर्तन अकादमी यांच्या वतीने आयोजित 'मदार' या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनात सोलापूरकरांचे पाणावलेले डोळे खूप काही बोलून गेले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती.

२१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' ठरलेला आणि थेट फ्रान्समधील 'कान्स' चित्रपट महोत्सवात कौतुकाची थाप मिळवलेला 'मदार' हा चित्रपट खऱ्या अर्थाने मातीतील गोष्ट सांगणारा ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातीलच सुपुत्र असल्याने सोलापूरकरांसाठी हा सोहळा अभिमानाचा ठरला. ​चित्रपट संपल्यानंतर उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिग्दर्शक मंगेश बदर यांचे स्वागत केले. अनेक प्रेक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधून चित्रपटातील प्रसंगांनी कशा प्रकारे भावूक केले, हे आवर्जून सांगितले.

दुष्काळ आपत्तीही अन्‌ सामाजिक-मानसिक वेदनाही

​दुष्काळाचे चटके बसल्याने पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांचे होणारे हाल आणि उद्ध्वस्त होणारी शेती. गावात रोजगार नसल्याने तरुणांना नाईलाजाने पुणे-मुंबईसारख्या शहरांकडे वळावे लागते, याचे वास्तववादी चित्रण. आर्थिक विवंचनेत जगणाऱ्या गावकऱ्यांचे असह्य जगणे आणि अखेरीस वरुणराजाच्या आगमनाने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य. दुष्काळ ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर ती एक सामाजिक आणि मानसिक वेदना आहे, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT