ST 
महाराष्ट्र बातम्या

ST STRIKE: विलिनीकरणासाठी लवकरच GR निघणार

न्यायालयाच्या आदेशानुसार ३ महिन्याच्या आत याबाबत अहवाल सादर करण्यात येईल.

रश्मी पुराणिक

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे राज्यात सध्या एसटी सेवा बंद (St Bus Strike) आहे. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये (State Government) विलीनीकरण करावे, या मागणीवर कामगार संघटना ठाम आहेत. दरम्यान एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याबाबत लवकरच जीआर जारी होणार आहे.

विलिनीकरणाबाबत अहवाल देण्यासाठी नेमण्यात येणार्‍या समितीत राज्याचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांचा सहभाग असेल. सूत्रांनी ही माहिती दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार ३ महिन्याच्या आत याबाबत अहवाल सादर करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संचित तोटा वाढल्याने उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी आवस्था झाली आहे. कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देणे मुश्‍किल झाले आहे. कोरोनामुळे महामंडळासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सर्व चालक, वाहकांनी आज कामबंद आंदोलन तीव्र केले असून राज्यातील महामंडळाच्या 250 पैकी 25 आगारातूनच बसेसवा सध्या सुरू आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन आणखीनच चिघळले असून ३० च्या वर एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरच आज न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. न्यायालय जो आदेश देईल पालन करू, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT