Sugarcane Sakal
महाराष्ट्र बातम्या

उसाच्या नोंदणीसाठी स्वतंत्र ॲप

बिगर नोंदणी असलेल्या उसाची नोंदणी शेतकऱ्यांना आता थेट साखर आयुक्तालयाकडे करता येणार आहे. यासाठी साखर आयुक्तालयाने स्वतंत्र उस नोंदणी ॲप विकसित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बिगर नोंदणी असलेल्या उसाची नोंदणी शेतकऱ्यांना आता थेट साखर आयुक्तालयाकडे करता येणार आहे. यासाठी साखर आयुक्तालयाने स्वतंत्र उस नोंदणी ॲप विकसित केले आहे.

पुणे - साखर कारखान्याकडे बिगर नोंदणी असलेल्या उसाची नोंदणी शेतकऱ्यांना आता थेट साखर आयुक्तालयाकडे करता येणार आहे. यासाठी साखर आयुक्तालयाने स्वतंत्र उस नोंदणी ॲप विकसित केले आहे.

उस लागवड केली. पण त्या लागवडीची नोंदणी सहकारी साखर कारखान्याकडे केली नाही, म्हणून उसाची तोडणीच होऊ शकली नाही. यामुळे ऊस लागवडीचा आणि जोपासण्याचा खर्च पाण्यात गेला आणि या उसापासून मिळणारे आर्थिक उत्पन्नही बुडाले, अशी अवस्था ही उसाची रीतसर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची होत असते. याला उपाय म्हणून राज्याच्या साखर आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे.

ॲपच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. त्याची आता चाचणी केली जात आहे. ही चाचणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल. या चाचणीत आढळूनआलेल्या त्रुटींची पूर्तता केली जाणार आहे. त्रुटींचीपूर्तता केल्यानंतर हे ॲप कार्यान्वित केले जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी हे घरबसल्या त्यांच्या उसाची नोंदणी करू शकणार आहेत. परिणामी राज्यातील उसाचे अचूक क्षेत्र कळण्यास मदत होईल. शिवाय साखर कारखान्याकडे उसाची नोंदणी नसली तर साखर आयुक्तालयाकडे मात्र नोंदणी होणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

राज्यातील अनेक शेतकरी उस लागवडीची रीतसर नोंदणी करत नाहीत. त्यामुळे राज्यात बिगर नोंदणी केलेला ऊस किती, याचा अंदाज येत नाही; परंतु यावर मार्ग काढण्यासाठी साखर आयुक्तालयाच्या वतीने स्वतंत्र ॲप विकसित केले आहे. त्यावर शेतकरी घरबसल्या उस लागवडीची नोंदणी करू शकणार आहेत. परिणामी साखर कारखान्याकडे नोंदणी नसलेल्या बिगर नोंदणी उसाची नोंदणी या ॲपवर होणार आहे.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT