raju shetti
raju shetti sakal media
महाराष्ट्र

'साडेचार हजार कोटींचा फटका; शेतकऱ्यांना मदत पॅकेज जाहीर करा'

सकाळ डिजिटल टीम

ताबडतोब पंचनामे होण्याची आवश्यकता असून सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा

सांगली - गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठीकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाचा फटका सांगलीतील द्राक्षे आणि डाळिंब बागांनाही बसला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा (insurance) योजना सक्षम करावी. यामध्ये त्रुटी दूर करुन ८ महिन्याऐवजी वर्षभरासाठीच विमाकवच शेतकऱ्यांना द्यावे, असे आवाहन स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केले. (raju shetti) ते सांगलीतील मिरज तालुक्यातील लींगणूर येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली.

ते म्हणाले, अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यातील ६० ते ७० हजार एकरवरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. संपूर्ण द्राक्ष बागांचे नुकसानीमुळे उत्पादक शेतकऱ्यांचे याचा फटका बसला आहे. लाखोंच्या गुंतवणूकीचा फटका शेतकऱ्याला सहन न होणार आहे. याचे ताबडतोब पंचनामे होण्याची आवश्यकता असून सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांना मदत करावी.

पुढे ते म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा साडेचार हजार कोटीचा आहे. विमाकवच मधील त्रुटी दूर न केल्यास भविष्यातील सांगलीतील द्राक्ष बागा दुर्मिळ होण्याचा धोका असून याचा फटका शेतकऱ्यासह बॅंक व्यवस्थेलाही सहन करावा लागणार आहे. बॅंकांनी यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक केल्याने व्यवस्था मोडकळीस येऊ शकते. त्यामुळे सरकराने याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, शेट्टी यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT