Maratha Reservation Sakal
महाराष्ट्र बातम्या

मराठा आरक्षणाबाबत गरज भासल्यास विशेष अधिवेशन; अजित पवार

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत गरज भासल्यास विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मराठा समाजाला (Maratha Society) आरक्षण (Reservation) देण्याबाबत गरज भासल्यास विधिमंडळाचे (Vidhimandal) एक दिवसाचे विशेष अधिवेशन (Special Session) बोलावण्यात येईल. त्यामध्ये आरक्षणाबाबत पुन्हा ठराव करून शिफारस (Recommended) केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pwar) यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. (Special session on Maratha reservation if need Ajit Pawar)

पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निकाल देताना हा अधिकार राज्याला नसून संसद आणि राष्ट्रपती यांना असल्याचे म्हटले आहे. तमिळनाडू राज्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यात आले असून, न्यायालयाने याबाबत कोणतीही टिपण्णी केलेली नाही. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर गरज भासल्यास एक दिवसीय अधिवेशन किंवा जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत पुन्हा ठराव करून शिफारस केली जाईल. इतर समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे.

तसेच, येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल. तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर कोणीही राजकारण करू नये, असे त्यांनी आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Exam: नीट पेपर लीक प्रकरणात नवा खुलासा; २७ एप्रिललाच शुभमच्या हातात प्रश्नपत्रिका... उत्तर प्रदेश - हरियाणा कनेक्शनही समोर

Latur News: लातुरच्या शिक्षण बाजारात ५०० कोटींची उलाढाल, प्रामाणिक पॅटर्नला क्लासेसच्या जीवघेण्या स्पर्धेनं गालबोट, 'मॅनेज'साठी नवा फंडा

शेतकरीपुत्राने कसं उभारलं RCC क्लासेसचं १०० कोटींचं साम्राज्य, एक खोली ते ८ शहरांमध्ये विस्तार; कोण आहे शिवराज मोटेगावकर?

Akola News: पाच दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा; पारा ४६.३ अंशांवर : दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळा; आरोग्याला जपा

Latest Marathi News Live Update : आज विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT