sputnik v file photo
महाराष्ट्र बातम्या

देशात 10 ठिकाणी मिळणार स्पुटनिक-V लस

अर्चना बनगे

कोल्हापूर: भारतात (India) कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना रशियाच्या स्पुटनिक- V (Russia sputnik v) लशीच्या दीड लाख डोसची पहिली बॅच हैदराबादमध्ये (Hyderabad)बॅच दाखल झाली होती. मात्र आता स्पुटनिक- V लस लवकरच देशात 10 ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यात कोल्हापूर, मुंबईसह (Kolhapur, Mumbai)देशातील दहा शहराचा समावेश आहे. या लसीची भारतात निर्मिती करीत असलेल्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे.(sputnik-v-vaccine-available-in-10-place-in-india-covid-19-update-marathi-news)

रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडच्या (आरडीआयएफ) सहकार्याने डॉ. रेडीज लॅब भारतात कोरोना वरील स्पुटनिक v लसीची निर्मिती करत आहे.स्पुटनिक V लसीला भारतासह 60 देशांनी मंजुरी दिली आहे. RDIF कंपनीने भारतात या लसीच्या वितरणाससाठी डॉ. रेड्डीज लॅब आणि ग्लँड फार्मासह एकूण 5 कंपन्यांशी करार केला आहे. मॉस्कोच्या गॅमालेया इन्सिट्युटने ही लस विकसित केली आहे. मात्र, या लसीच्या ट्रायलचे अंतिम परिणाम येण्याआधीच लसीला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे सुरुवातीला थोडा वादही निर्माण झाला होता. मात्र, आता या लसीचे फायदे जगजाहीर झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

"स्पुटनिक V जगातल्या इतर सर्व लशींमध्ये सर्वात प्रभावी आहे. आणि ही लस कोव्हिड-19 च्या नव्या स्ट्रेनवरही परिणामकारक असेल. लवकरच स्थानिक पातळीवर या लसीचं उत्पादन सुरू होईल आणि हळूहळू दरवर्षी 85 कोटी डोस उत्पादन करण्याची योजना आहे." असे रशियाचे भारतातले राजदूत निकोले कुदाशेव म्हणाले होते .

या शहरात लस उपलब्ध होणार

कोल्हापूर, मुंबई, बंगलोर, चेन्नई, कोलकत्ता, नवी दिल्ली, विशाखापट्टणम, बड्डी आणि मिरयालगुडा यांचा समावेश आहे.

स्पुटनिक लशीची वैशिष्ट्ये

या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लस 2 ते 8 अंश सेल्सियसवरही साठवता येते. त्यामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

ही लस तयार करण्यासाठी सर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे.

मानवी शरीरात गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आरोग्याला नुकसान होऊ नये, असे काही बदल या विषाणूमध्ये करण्यात आले आहेत.

स्पुटनिक V लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. स्पुटनिक V लसीचा दुसरा डोस 21 दिवसांनी देतात. इतर कुठल्याही कोव्हिड लसीचे दोन्ही डोस सारखेच असतात.

कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचा एक अंश शरीरात गेल्यानंतर रोगप्रतिकारक यंत्रणा सक्रीय होते. आणि लस घेतल्यानंतर शरीर अँटीबॉडी तयार करते. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी तयार होते.

दोन्ही डोसमध्ये कोरोना विषाणूच्या विशिष्ट 'स्पाईक'ला लक्ष्य करतात. मात्र, यासाठी दोन वेगवेगळ्या न्यूट्रल विषाणूचा व्हेक्टर म्हणजेच रोगवाहक म्हणून वापर केला जातो. शरीरात एकच व्हेक्टर दोन वेळा जाण्याऐवजी दोन वेगवेगळे व्हेक्टर गेल्यास रोगप्रतिकारक यंत्रणा अधिक मजबूत होते, असा तर्क यामागे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

SCROLL FOR NEXT