ST Bus (file photo) esakal
महाराष्ट्र बातम्या

ST samp: बैठक निष्पळ? एसटी संपाबाबत कोणताही तोडगा नाही; राज्यात उद्यापासून...

Gopichand Padalkar: ''आज रात्री पगारवाढीची घोषणा झाली नाही तर आज रात्रीपासून राज्यभरातील सर्व एस टी कर्मचारी संपावर जातील, असा इशारा सत्ताधारी पक्षातील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ''

संतोष कानडे

मुंबईः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर जात आहे. त्यापूर्वी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक पार पडली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती येत आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतील बैठक निष्फळ ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नसल्याने कर्मचारी उद्यापासून संपावर जाऊ शकतात.

ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको, यासाठी उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संपावर ठाम, अशी एसटी कर्मचारी संघटनांची भूमिका आहे.

एसटी कर्मचारी कृती समितीकडून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. दुसरीकडे बुधवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांचा इशारा

आज रात्री पगारवाढीची घोषणा झाली नाही तर आज रात्रीपासून राज्यभरातील सर्व एस टी कर्मचारी संपावर जातील, असा इशारा सत्ताधारी पक्षातील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, आम्ही सरकारी पक्षात असलो तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत. अधिकाऱ्यांना सुचना देऊनही ते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत. आम्हांला कोणालाही अडचणीत आणायच नाही, आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही पण जर सुचना देऊनही महिनाभर का पगारवाढ झाली नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai 7/11 Blast Case : मुंबई उच्च न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष का सोडलं? सुनावणीवेळी काय झालं?

Latest Maharashtra News Updates : सांताक्रुझमध्ये सर्विस रोड पाण्याखाली; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Gold Rate Today: सोन्याचा भाव 1,00,000 रुपयांच्या वर; चांदीचे भाव मात्र स्थिर, जाणून घ्या वाढीचे कारण?

Saiyara Box Office Collection: सैयाराने 3 दिवसात कमावले 100 कोटी, सर्वांधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट, नक्की काय आहे स्टोरी?

Pune Updates : हजारो किलो मटण, चिकन, मासळी फस्त; कोठे रंगल्या आखाड पार्ट्या, तर कोठे कुटुंबीयांकडून मांसाहाराला प्राधान्य

SCROLL FOR NEXT