ST Bus News esakal
महाराष्ट्र बातम्या

St News: दिवाळी निमित्त आता प्रवासाच नो टेंशन; महामंडळ सोडणार ज्यादा गाड्या!

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीसाठी एसटी महामंडळाने यंदाच्या वर्षीसुद्धा जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. पुण्यात आज त्याबाबत बैठक पार पडली असून लवकरच त्याची घोषणा केली जाणार आहे. गेल्या वर्षी नियोजित एसटीच्या फेऱ्यांव्यतिरिक्त मुंबईतून १५०; तर पुण्यातून २०० बस सोडण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे यंदाही राज्यभरात लांब पल्ल्यांसाठी एसटी महामंडळाने नियोजन केले आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी ठिकाणांहून लांब पल्ल्यांवर धावणाऱ्या खासगी बसची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एसटीने त्या ठिकाणांहून प्रवाशांना लांब पल्ल्याचा सुरक्षित प्रवास देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

पुण्यात नोकरी वा शिक्षणाच्या निमित्ताने असणारे विदर्भातील नागरिक दिवाळीला हमखास घरी परततात. मात्र, रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याने नाईलाजास्तव ते खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करतात. अशा वेळी पर्याय म्हणून पुण्याहून विदर्भासाठी सर्वाधिक बस सोडण्याचा विचारही एसटी महामंडळ करत असल्याचे सांगण्यात आले.

खासगी वाहतूकदारांवर करडी नजर

एसटी स्थानकांवरून टप्पा वाहतूक, जादा प्रवासी आणि जादा भाड्याशिवाय मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर राज्य परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे. अशा वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही राज्य परिवहन विभागाने दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT