ST Strike sakal media
महाराष्ट्र बातम्या

ST Strike: संपकऱ्यांना कामावर हजार होण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

31 मार्चपर्यंत नियुक्त झाल्यास कारवाई मागे घेणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शुक्रवारी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत निवेदन करताना, एसटी कर्मचा-यांनी 31 मार्च पर्यंत कर्तव्यावर रुजू होण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा एकदा आवाहन केले आहे. तर कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर कर्मचा-यांवरील करण्यात आलेल्या कारवाया मागे घेण्याचेही स्पष्ट केले आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने परिपत्रक काढले आहे.

त्यामध्ये संप काळामध्ये 31 मार्च पर्यंत कर्तव्यावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रुजू करुन घेण्यात यावे. तर विभाग, घटक , आगारातील संप कालावधीमध्ये ज्या कर्मचा-यांवर शिस्त व आवेदन कार्यपध्दती अंतर्गत निलंबनाची कारवाई झालेल्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे. तर शिस्त व आवेदन कार्यपध्दती अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस दिलेले कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्यास त्यांच्यावरील नोटीस मागे घेण्यात यावी. शिवाय संपकालावधीत करण्यात आलेल्या बदल्या रद्द करून त्यांना पूर्ववत बदलीपूर्वीच्या ठिकाणी हजर करुन घेण्याचे आदेशही या परिपत्रकात दिले आहे.

यामध्ये सेवा समाप्ती झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला असून, सेवासमाप्त करण्यात आलेले कर्मचारी 31 मार्चपर्यंत हजर झाल्यास त्यांची सेवासमाप्ती रद्द करून 1 एप्रिल पासून पुर्ननियुक्ती देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संपातील एसटी कर्मचाऱ्यांना एसटीच्या परिपत्रकामुळे दिलासा मिळाला असून, संपावरील एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर होत असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Leopard : मंचर परिसरात तब्बल २० बिबट्यांचा वावर, पेठ येथे पोलट्रीवर बिबट्याची बैठक!

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Eknath Shinde : चाकणला उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; लाडकी बहिण योजना बंद होणार नाही!

Latest Marathi Live Update News : राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

SCROLL FOR NEXT