Anil parab sakal media
महाराष्ट्र बातम्या

ST Strike: 'तोपर्यंत अंतरिम वाढीचा पर्याय दिलाय' - अनिल परब

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी म्हटलंय की, एसटीचं राज्यशासनात विलीनीकरणाची मागणी संपकऱ्यांकडून होत होती. यासंदर्भात एसटीचे प्रतिनीधी सदाभाऊ खोत, पडळकर यांच्याशी बैठक झाली आहे.

या बैठकीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, वेतनवाढ व्हावी यासाठी राज्यशासनात विलीनीकरण करण्याबाबत मागणी होत होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केलीय आणि त्या समितीसमोर हा विषय आहे. 12 आठवड्यात त्या समितीला अहवाल द्यायचा आहे. मात्र, त्याआधीच हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन सरकार म्हणून मी करु शकत नाही, हे मी त्यांना पुन्हा एकदा सांगितलं.

ते म्हणाले की, जी माहिती हवीय ती आम्ही समितीला देतोय. विलीनीकरण करायचं म्हटलं तरी या प्रोसेसला मोठा कालावधी लागेल. त्यामुळे तोवर संप चालू शकत नाही. तोपर्यंत दुसरा पर्याय असेल तर सांगावा, अशी मागमी केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

परब यांनी म्हटलंय की, समितीचा अहवाल येईल तो राज्यशासन मान्य करेल. मात्र तोपर्यंत काही अंतरिम निर्णय घेता येतो का याबाबतचे पर्याय संपकरी कामगारांना देण्याबाबत चर्चा झाली. एखादा हंगामी निर्णय घेता येऊ शकेल का, याबाबत चर्चा झाली. जी ऑफर दिलीय, त्याबाबत उद्या सकाळी अकरा वाजता बैठक घेण्यांच ठरंलय. ऑफर म्हणजे पैशांची ऑफर नाहीये. दोनतीन जे पर्याय आहेत, त्यामध्ये अंतरिम पगार वाढीचा पर्याय आहे. याबाबत ते उद्या विचार करुन कळवतील, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT