solapur issues of voters

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

अबब..! सोलापूर जिल्ह्यात १,४३,८९३ मतदार मयत, २,०९,२९१ स्थलांतरित, तर दुबार मतदार सव्वालाखावर; मतदारांना १७ तारखेपर्यंत करावा लागणार ‘या’ वेबसाईटवर अर्ज, अन्यथा...

सोलापूर जिल्ह्याच्या मतदार यादीत ३९ लाख ४१ हजार ९५ एकूण मतदारांपैकी १ लाख २८ हजार ७१५ मतदार गैरहजर, २ लाख ९ हजार २९१ मतदार स्थलांतरित, १ लाख ४३ हजार ८९३ मृत तर १ लाख २९ हजार ३२६ दुबार मतदार आढळले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात (एसआयआर) ही माहिती समोर आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या मतदार यादीत ३९ लाख ४१ हजार ९५ एकूण मतदारांपैकी १ लाख २८ हजार ७१५ मतदार गैरहजर, २ लाख ९ हजार २९१ मतदार स्थलांतरित, १ लाख ४३ हजार ८९३ मृत तर १ लाख २९ हजार ३२६ दुबार मतदार आढळले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात (एसआयआर) ही माहिती समोर आली आहे.

३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बीएलओमार्फत घरोघरी भेटी देऊन मतदारांचे प्रगणना फॉर्म वाटप करून ते भरून घेण्याचे काम सुरू आहे. सध्या करमाळा तालुक्यात ३६२१ गैरहजर, स्थलांतरित २२३०१ तर मृत १४६५२ आणि दुबार ७३११ मतदार आढळले आहेत. तसेच माढा तालुक्यात गैरहजर २०२२, स्थलांतरित १६४७३, मृत ५२३६, दुबार १३७५५, बार्शी तालुक्यात गैरहजर ७००६, स्थलांतरित १८२१७, मृत ७०५०, दुबार १६८५२, मोहोळ तालुक्यात गैरहजर १५३४, स्थलांतरित १५२५१, मृत १५७३३ दुबार ४४४५, सोलापूर उत्तरमध्ये गैरहजर २८४०४, स्थलांतरित १४८६४, मृत १४७२६, दुबार ८८९४ मतदार आढळले आहेत.

तसेच अक्कलकोट तालुक्यात गैरहजर ६८०५, स्थलांतरित २८४११, मृत १७३४४, दुबार १२९३०, सोलापूर दक्षिणमध्ये गैरहजर ५९३७, स्थलांतरित २३०२४, मृत १४७६७, दुबार १२४०५, पंढरपूर तालुक्यात गैरहजर ७८२७, स्थलांतरित २३२९६, मृत १०४३५, दुबार २०७४८, सांगोला तालुक्यात गैरहजर ४४५२, स्थलांतरित ११०९८, मृत १३०९३, दुबार ५४९४, माळशिरस तालुक्यात गैरहजर २९०८, स्थलांतरित १४५२२, मृत १३९७८, दुबार ६३१४ असे एकूण गैरहजर १२८७१५, स्थलांतरित २०९२९१, मृत १४३८९३, दुबार १२९३२६ मतदार आढळले आहेत. यात सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील अशा मतदारांची संख्या अधिक आहे.

१७ ऑगस्टपर्यंत बीएलओंशी संपर्क साधून प्रगणना अर्ज भरावा

गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची यादी ग्रामसभा व वॉर्ड सभांमध्ये वाचन करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांचे नाव अशा याद्यांमध्ये आहे, त्या मतदारांनी यादीतील नाव तपासून, १७ ऑगस्टपर्यंत बीएलओशी संपर्क साधून प्रगणना फॉर्म भरावा किंवा voters.eci.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा. जेणेकेरून त्यांचे नाव पुन्हा मतदारयादीत समाविष्ट होईल.

- एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी, सोलापूर

‘सोलापूर शहर मध्य’मध्ये १.१७ लाखांवर मतदार कमी

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात सध्याच्या मतदार पुनरीक्षणात ५८ हजार १९९ मतदार त्यांच्या पत्त्यावर हजर नव्हते. तर स्थलांतरित मतदारांची संख्या २१ हजार ८३४ इतकी आढळली आहे. याशिवाय मतदार यादीतील १७ हजार ५९ मतदार मृत तर २० हजार १७८ मतदार दुबार आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT