Gunratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''ज्यांनी जरांगेंसमोर सर..सर... केलं त्यांनाच अध्यक्ष केलं'', सदावर्तेंचा कोर्टात जाण्याचा इशारा

संतोष कानडे

मुंबईः माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीला Adv. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आंतरवाली सराटीमध्ये जावून ज्यांनी मनोज जरांगे यांना सर.. सर... केलं, जे कार्यकर्ता स्वरुप म्हणा किंवा भाईचारा स्वरुप म्हणून जरांगेंकडे गेले, त्यांचीच निवड आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी केलेली आहे. पूर्वी ते कोणत्याही भूमिकेत गेलेले असले तरी आता ते घटनात्मक पदावर बसलेले आहेत.

सरकार मागास आयोग गठीत करत आहेत की मराठा आयोग? असा प्रश्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रेंची नियुक्ती केलेली आहे का? नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते का? व्यक्ती आवडतो म्हणून ममत्वभावाने नियुक्ती केली आहे? असे प्रश्न सदावर्तेंनी उपस्थित केलं.

सुनील शुक्रे पारदर्शकपणे काम करतील का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडीविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. विरोधाला विरोध म्हणून होत असलेल्या आरोपांवर सदावर्ते म्हणाले, संविधानिक बाबी पारदर्शकपणे मांडणं सोपं काम नाही, मी आरक्षणाच्या प्रश्नावर लढत राहणार असंही सदावर्ते यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT