ST Sakal
महाराष्ट्र बातम्या

ST Employee : राज्य सरकारची एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; अग्रीम म्हणून देणार १२५०० रूपये

राज्य सरकारने यावर्षी एसटी महामंडळाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिवाळीच्या निमीत्ताने दिली भेट.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्य सरकारने यावर्षी एसटी महामंडळाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिवाळीच्या निमीत्ताने भेट दिली आहे. दिवाळीपुर्वीच महिन्याचा पगार केला जाणार असून, त्यामध्ये ५००० रूपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्याशिवाय सण अग्रीम म्हणून १२५०० रुपये देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. आता यंदाही एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार सानुग्रह अनुदान मिळणार आहे.शिवाय राज्य परिवहन महामंडळातील तृतीय आणि चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांना ज्यांचे वेतन ४३४७७ अथवा त्यापेक्षा कमी आहे.

अशा कर्मचाऱ्यांना सण अग्रिम म्हणून १२५०० म्हणून देण्यात येणार असल्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामूळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट २० टक्के वाढ; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

कोचिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक विद्यार्थी अडकले, जीव वाचवण्यासाठी धडपड

Eastern Freeway: एमएमआरडीएच्या विस्तारीकरण प्रकल्पात बदल, ९४९ झाडे वाचणार; प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT