Divakar Raote
Divakar Raote 
महाराष्ट्र

एसटीची भाडेवाढ अटळ, जुनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय -  रावते

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : डिझेलचे वाढते दर आणि एसटी महामंडळाचे होणारे नुकसान याचा हिशोब जुळवताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ अटळ आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. 


एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या गार्डनचा शुभारंभ  रावते यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या डिझेलची सतत दरवाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यात डिझेल दरवाढीने एसटी महामंडळाला 470 कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसला आहे. डिझेल दरवाढ आणि एसटी बसचे सध्याचे तिकीटांचे दर याचा हिशोब जुळणे अवघड झाले आहे. आज पुन्हा 35 पैशांची डिझेल वाढल्याचे सांगत त्यांनी आता तिकीट दर वाढ केल्याशिवाय एसटीला पर्याय नाही असे स्पष्ट केले.

मुळात एसटीचा दोन हजार 300 कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. त्यातच कामगारांच्या वेतन कराराचा मोठा भार पडणार आहे. अशा एकुणच परिस्थितीत एसटी टिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे ही भूमिका आहे. सध्या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल परदेश दौऱ्यावर आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात ते आल्यानंतर तिकीट दरवाढ करण्याच्या अनुशंगाने चर्चा करुन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. या संदर्भात आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. एसटी कराराचा प्रश्‍न न्यायालयाच्या बाहेर सुटावा अशी अपेक्ष होती. मात्र, ते शक्‍य झाले नाही. यावरही लवकरचर निर्णय घेण्याचे सुचक वक्‍तव्य त्यांनी केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त मिलींद भारंबे, विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांची उपस्थिती होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT