vishwapatil
vishwapatil 
महाराष्ट्र

पानिपतच्या प्रदर्शनाला  स्थगिती द्या - पाटील

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आगामी ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपल्या साहित्याचे व संशोधनाचे चौर्यकर्म करण्यात आले आहे, त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विख्यात साहित्यिक व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

विश्‍वास पाटील यांनी आठ वर्षे संशोधन करून लिहिलेल्या ‘पानिपत’ या कादंबरीवर आधारित रणांगण हे नाटकही रंगभूमीवर आले होते. त्या दोघांनाही मराठी रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. लवकरच प्रसिद्ध होत असलेल्या ‘पानिपत’ या चित्रपटात आपल्या या साहित्यातील प्रसंग, तपशील आदींचे चौर्यकर्म करण्यात आले. माझ्या साहित्यातील हा तपशील चित्रपटात वापरण्यापूर्वी माझी परवानगीही घेण्यात आली नव्हती, असा पाटील यांचा दावा आहे. आशुतोष गोवारीकर प्रॉडक्‍शन, चित्रपटाचे निर्माते रोहित शेलटकर व सुनीता गोवारीकर तसेच रिलायन्स एंटरटेन्मेंट यांच्याविरोधात हा सूट दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी सोमवारी न्या. एस. सी. गुप्ते यांच्यासमोर होण्याची शक्‍यता आहे.

रोहित शेलटकर यांचे प्रतिनिधी विख्यात साहित्यिक संजय पाटील यांना कान चित्रपट महोत्सवात भेटले, त्या वेळी एका ऐतिहासिक चित्रपटासाठी कथा हवी असल्याने पाटील यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्या वेळी पाटील यांनी ‘पानिपत’ व ‘रणांगण’ यांच्याबाबत शेलटकर यांना सांगितले. शेलटकरांनी यावर चित्रपटाची कथा लिहिण्यास सांगितल्यावर संजय पाटील यांनी विश्‍वास पाटील यांची परवानगी घेऊन कथा लिहिली, त्याचे शेलटकर यांच्यासमोर मुंबईत वाचनही झाले. मात्र नंतर शेलटकर यांनी संजय पाटील यांची हकालपट्टी केली. त्यामुळे हा चित्रपट थांबला असे विश्‍वास पाटील यांना वाटले. मात्र, आता लवकरच प्रदर्शित होत असलेल्या पानिपत चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर विश्वास पाटील यांना हे चौर्यकर्म कळले. या चित्रपटासाठी आपले साहित्य वापरण्यापूर्वी निर्मात्यांनी आपली परवानगी घेतली नसल्याचा दावा करून त्यांनी हा खटला दाखल केला आहे. दरम्यान, यासंदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT