Border Checking
Border Checking Sakal
महाराष्ट्र

महाराष्ट्र- कर्नाटक बॉर्डरवर कडक निर्बंध; सीमा मार्ग बंद

सकाळ वृत्तसेवा

निपाणी - राज्य शासनाच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्हाधिकारयांच्या आदेशानुसार बोरगाव सीमा तपासणी नाक्यावर निर्बंध आणखी कडक केले आहेत. सर्व वाहनधारक, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले आहे. शुक्रवारी (ता. २४) बोरगाव-पाचमैल सीमा तपासणी नाक्याला भेटीप्रसंगी ते बोलत होते.

तहसीलदार डॉ. भस्मे म्हणाले, परराज्यातून कर्नाटकात प्रवेश करताना कोविड आरटी-पीसीआर रिपोर्ट सर्वांना बंधनकारक आहे. त्याशिवाय राज्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कर्नाटक राज्यातील नागरिकही महाराष्ट्र राज्यात गेल्यानंतर परत येताना रिपोर्ट गरजेचा आहे. सदलगा पोलिस ठाण्यामार्फत सर्व सीमा मार्ग बंद केल्या आहेत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. या नाक्यावरून महाराष्ट्रामधून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. यामध्ये चारचाकी व दुचाकी यांचाही समावेश आहे. कामगार, शेतकरीवर्गही मोठा आहे. पण सरकारच्या नियमानुसार सर्वांची तपासणी केली जाणार आहे. नाक्यावर तपासणी करण्यासाठी अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, शिक्षक, होमगार्ड व पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

बोरगाव सीमा तपासणी नाक्यावर पोलिस वाहनांची तपासणी करून आरटी-पीसीआर रिपोर्ट नसलेल्यांना परत महाराष्ट्र राज्यात पाठवित आहेत. सर्वांनी रिपोर्ट तपासूनच वाहने सोडावित, अशी सूचना यावेळी डॉ. भस्मे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "नरेंद्र मोदींना मी इस्त्राइलला घेऊन गेलो होतो"; शरद पवारांनी संपूर्ण इतिहास काढला

Astronomers: खगोलशास्त्रज्ञांनी 55 प्रकाशवर्षे दूर पृथ्वीच्या आकाराचा एक नवीन ग्रहाचा लावला शोध

Sunil Chhetri : हा माझा अखेरचा सामना असेल... भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने अचानक घेतली निवृत्ती, भावुक Video केला शेअर

Jr NTR: ज्युनियर एनटीआरचं होतंय कौतुक; वाढदिवसाच्या आधी इतके पैसे मंदिराला केले दान

Maharashtra Politics: 4 जूननंतर पुन्हा खेला होबे? शरद पवार गट, ठाकरेंचा गट फुटणार असल्याचा भाजप नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT