Scholarship
Scholarship 
महाराष्ट्र

संशोधनासाठी जा ऑस्ट्रेलियात

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठांतील महाविद्यालयांमध्ये विविध विद्या शाखांत पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ऑस्ट्रेलियात संशोधनाची संधी मिळणार आहे. राज्य सरकारने केलेल्या करारामुळे निवडक विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील एका नामांकित विद्यापीठातून पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

राज्य सरकारने ‘उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण’ या उपक्रमांतर्गत ऑस्ट्रेलियातील द युनिर्व्हसिटी ऑफ न्यू साउथ वेल्स (यूएनएसडब्ल्यू) बरोबर करार केला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी राज्यातून वीस विद्यार्थी निवडले जाणार आहेत. शिष्यवृत्तीच्या निवड प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यात सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात पुणे विद्यापीठातील दोन, संत गाडगे बाबा विद्यापीठातील (अमरावती) चार आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील (सोलापूर) एक, अशा सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर पदवीचे गुण आणि त्यादरम्यान केलेले संशोधन या आधारे ही निवड होत असल्याची माहिती राज्य सरकारच्या ‘उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण’ अंतर्गत नेमलेल्या समितीच्या निमंत्रक डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. 

पुणे विद्यापीठाच्या इलेक्‍टॉनिक्‍स विभागातून एम.एस्सीचे (इलेक्‍ट्रॉनिक सायन्स) शिक्षण पूर्ण केले आहे. यात मेट्रोलॉजीमध्ये संशोधन प्रकल्प सादर केला होता. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना या संशोधनाचा फायदा झाला. पहिल्या फेरीत शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तज्ज्ञांसमेवत चर्चा झाली व शिष्यवृत्तीसाठी निवडीचे पत्र मिळाले.  
- हर्ष तांती, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT