Punyashlok Ajilyadevi Holkar solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा! विद्यापीठाची २ एप्रिलपासून अंतिम सत्र परीक्षा; अभियांत्रिकीची परीक्षा ३० एप्रिलपासून; प्रत्येक केंद्रावर ‘सीसीटीव्ही’

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा २ एप्रिलपासून सुरु होणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पदवी व पदव्युत्तर पदवी आणि अभियांत्रिकीसह २८४ अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा २ एप्रिलपासून सुरु होणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पदवी व पदव्युत्तर पदवी आणि अभियांत्रिकीसह २८४ अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात होते. अन्य विद्यार्थ्यांची परीक्षा १०९ केंद्रांवर होईल. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बार्शी विभागासाठी एक, सोलापूर शहर परिसरासाठी एक आणि उर्वरित ग्रामीण भागासाठी एक असे एकूण तीन भरारी पथके असणार आहेत. परीक्षा तीन सत्रात होणार असून पहिले सत्र सकाळी नऊ ते ११, दुसरे सत्र दुपारी १२ ते तीन आणि तिसरे सत्र दुपारी तीन ते सायंकाळी सहा, असे असणार आहे. दरम्यान, प्रत्येक परीक्षा केंद्रांवर व केंद्रातील वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संलग्नित १०९ उच्च महाविद्यालयांशी त्यासंदर्भातील पत्रव्यवहार केला आहे. केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भातील अहवाल विद्यापीठास सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑनस्क्रिन पद्धतीने तर उर्वरित अभ्यासक्रमांचे पेपर ऑफलाईन तपासले जातील. २०२६-२७ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरु करण्याचे नियोजन देखील विद्यापीठाने केले आहे.

असे आहे परीक्षेचे नियोजन

  • २ एप्रिलपासून पदवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा

  • १६ एप्रिलपासून पदव्युत्तर पदवी, लॉ, शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांची परीक्षा

  • ३० एप्रिलपासून अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा

३१ मेपूर्वी सर्व निकाल लागतील असे नियोजन

कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सत्र परीक्षेच्या निकालासाठी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य, प्राध्यापकांनी सहकार्य केले. त्यामुळे २८४ पैकी २६६ अभ्यासक्रमांचे निकाल ३० दिवसांत तर ११८ अभ्यासक्रमांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर झाले. आता अंतिम सत्र परीक्षेचा निकाल देखील १५ मेपूर्वी लावले जातील, असे नियोजन आहे. अभियांत्रिकीचे निकाल ३१ मेपूर्वी जाहीर होतील. आता परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

अंतिम सत्र परीक्षेसंदर्भात

  • परीक्षा केंद्रे

  • १०९

  • एकूण परीक्षार्थी

  • ७९,०००

  • भरारी पथके

  • परीक्षा सत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया; कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update: मुंबईत गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT