Career esakal
महाराष्ट्र बातम्या

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनो, विज्ञान, वाणिज्य अन्‌ कला शाखेतूनही करिअरची संधी! लॉ, हॉस्पिटॅलिटी, फार्मसी, नर्सिंग, मेडिकील, सीए होण्याचीही संधी, वाचा...

विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार करिअरची संधी उपलब्ध आहेत. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत. ज्यातून विद्यार्थ्यांना लवकर करिअरची सुरवात करता येते. याशिवाय आयटी कोर्समधूनही विद्यार्थ्यांना हमखास करिअरची संधी आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनुसार अचूक पर्याय निवडून करिअरची मार्ग शोधू शकतात. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार करिअरची संधी उपलब्ध आहेत. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत. ज्यातून विद्यार्थ्यांना लवकर करिअरची सुरवात करता येते. याशिवाय आयटी कोर्समधूनही विद्यार्थ्यांना हमखास करिअरची संधी आहेत. त्यात वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, ॲप डेव्हलपमेंट असे कोर्स महत्त्वाचे आहेत.

१) विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी....

  • अभियांत्रिकी : विद्यार्थी विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये (बी.टेक.) प्रवेश घेऊ शकतात. संगणक विज्ञान, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल अशा शाखा आहेत.

  • वैद्यकीय (मेडिकल) : एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

  • फार्मसी : बी. फार्मसी किंवा डी. फार्मसीसारखे अभ्यासक्रम विद्यार्थी पूर्ण करून करिअर करू शकतात.

  • नर्सिंग : बीएससी नर्सिंग किंवा इतर नर्सिंग कोर्स करून विद्यार्थी विशेषतः: मुलींना यातून करिअरची मोठी संधी आहे.

२) कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी...

  • बीए : बारावीनंतर इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयातून विद्यार्थी पुढे करिअर करू शकतात. सरकारी नोकरीसाठीही या विषयांचा मोठा फायदा होतो.

  • फायनान्स : बीए इन इकॉनॉमिक्स किंवा बीबीएचे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी फायनान्स क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात.

  • कायदा (लॉ) : बीएएलएलबी किंवा इंटिग्रेटेड एलएलबी (पाच वर्षे) पूर्ण करून विद्यार्थी वकिली व्यवसायात उतरू शकतात.

  • पत्रकारिता : पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी करिअर करू शकतात.

  • हॉस्पिटॅलिटी : हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन व्यवस्थापनात विद्यार्थ्यांना करिअरची मोठी संधी आहे.

  • इतर पर्याय : सामाजिक कार्य, डिझायनिंग, इव्हेंट मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांमधूनही विद्यार्थ्यांना पुढे करिअरची संधी आहे.

३) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी...

  • बी. कॉम : हा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी अकाउंटिंग, फायनान्स, टॅक्सेशन या क्षेत्रात करिअर करू शकतात.

  • व्यवस्थापन : बीबीएचे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी व्यवस्थापन (मॅनेजमेंट) क्षेत्रात करिअर करू शकतात.

  • चार्टर्ड अकाउंटंट : सीए होण्यासाठी विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण करावा लागतो, हा करिअरसाठी मोठा पर्याय उपलब्ध आहे.

  • इतर पर्याय : ऍक्ट्युरी सायन्स, बँकिंग, फायनान्समधूनही करिअरला वाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025 Live Streaming: भारतात सुरू होतोय १२ वर्षांनंतर वर्ल्ड कपचा थरार! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT