मुंबई : राज्य शासनाच्या (mva government) मराठी भाषा विभागातर्फे (Marathi language section) मुंबईत चर्नी रोड (charni road) येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनसाठी (Marathi Bhasha Bhavan) मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी यांनी अनेक कामांना गती दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भाषा भवनमध्ये अभिजात मराठी भाषाचे दालन (office) आणि त्याचे स्वरुप निश्चित कसे असावे मराठी भाषा तज्ञ, साहित्यिक यांच्याशी चर्चा केली.
यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष श्रीधर तथा राजा दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके, मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी यांच्यासह भाषा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ चे अध्यक्ष राजा दीक्षित यांनी यावेळी विभागाच्या दालनात सर्व संतांच्या कार्यकालाचा कालसुसंगत समावेश असावा. यापुढे मराठीविषयी भावनिकतेसोबत मानसिकता तयार करण्यात यावी.
राजभाषा, ज्ञानभाषा, लोकभाषा असा क्रमाने मराठीची ओळख करून द्यावी, सर्व भाषा विषयक साहित्य एका दालनात उपलब्ध करून द्यावे. भाषा विषयक सर्व पुरावे, साहित्य या दालनात असावे. महाराष्ट्र विश्वरूप दर्शन या ठिकाणी घडावे. भाषेची सर्व रुपे, बोली, महानुभव लिपीची तीन पातळीवर मांडणी व्हावी, आदी सूचना केल्या. तर डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमात प्राकृतचा समावेश करण्याची सूचना केली. तसेच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने यासाठी तत्काळ पुढाकार घेण्याची गरज आहे. मराठी भाषेच्या विकासातील विविध टप्प्यांचा या दालनात समावेश करावा, यासोबत महानुभाव व्याख्यानपध्दतीचाही यात समावेश करण्यात यावा, अशी ही सूचना केली.
प्रा. डॉ. हरी नरके यांनी २ हजार २५० वर्षांपूर्वी तामिळ संगम ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आलेला आहे. १२८५ मध्ये कन्नड विद्यापीठात मराठी भाषा शिकवली जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तामिळनाडूत काम करणारे कारागिर मराठी भाषेतून संवाद साधत असल्याचेही पुरावे आहेत, ही सर्व माहिती दालनात समाविष्ट करण्यात यावी. मराठीच्या ५२ बोलीभाषा असून त्याचाही या दालनात समावेश करण्यात यावा. याशिवाय भंडारकर प्राच्यविद्या संस्थेकडे ८५ दुर्मिळ ग्रंथ असून त्याचाही या दालनात समावेश करण्याची सूचना करावा अशी सूचना केली.
यावर मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई यांनी मराठी भाषा भवनामध्ये अभिजात मराठीचा परिचय करून देणारे स्वंतत्र असे दालन तयार केले जाणार आहे.यातून मराठी भाषेची महती व ऐश्वर्य कळेल, अशा स्वरुपाचे साहित्य या ठिकाणी ठेवले जाईल. अभिजात मराठीची महती सांगणारे सर्व साहित्य व पुरावे या दालनात ठेवले जाईल. या निमित्ताने मराठी माणसांच्या मनामध्ये मराठीविषयी विश्वास निर्माण केला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.