Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: अचानक ठरलं! उपमुख्यमंत्री भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला, दौऱ्यामागे राजकीय खेळी?

एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्यावर

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. ते अयोध्येत रामाचं दर्शन घेणार आहेत. हा फक्त शिवसेनेचा अयोध्या दौरा असल्याचं सांगितलं जात होतं. मुख्यमंत्री शिंदे येणार म्हणून अयोध्यामध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहेत. या दौऱ्याच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. देवेंद्र फडणवीस अचानक अयोध्या दौऱ्याला निघाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्यासोबत भाजपचे सर्वच मंत्री असणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

दोन दिवसापर्यंत अयोध्येचा दौरा केवळ शिवसेनेचा असल्याचं सांगितलं जात होतं. भाजपचे नेते या दौऱ्यात सामील होणार असल्याचं शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यांनी सांगितलं नव्हतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रभू रामाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही अयोध्येला जात असल्याचं सांगण्यात आलं.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानाने आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला गेले. त्यांच्यासोबत भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन होते. तसेच भाजप नेते मोहित कंबोज आणि आमदार संजय कुटेही होते. तोपर्यंतही देवेंद्र फडणवीस या दौऱ्याला येणार असल्याचं कुणालाच माहीती नव्हतं. मात्र, एकनाथ शिंदे हे लखनऊ विमानतळावर आल्यावर त्यांनी नवी माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस हे भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच थोड्यावेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरून अयोध्येकडे जाण्यासाठी निघाले आहेत. अचानक फडणवीस यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अयोध्या आणि लखनऊमध्ये या दौऱ्याची वातावरण निर्मिती करण्यात शिंदे यशस्वी झाल्यानेच भाजपनेही या दौऱ्यात सहभागी होत असल्याचं बोललं जात आहे. तसेच या दौऱ्यामागे कोणती राजकीय खेळी नाही ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT