sudhir mungantiwar after bjp core committee on rebel shivsena mla eknath shinde maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे, हा वाद आता सुप्रीम कोर्टात गेला आहे, कोर्टाने १२ जुलै पर्यंत बंडखोर आमदारांवर निलबंनाची कारवाई करता येणार नाही असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक पार पडली या बैठकीत शिवसेनेत पडलेल्या फूटीबाबात मंथन झाल्याची माहिती पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना सांगीतले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंथन झाले, तसेच या बैठकीत भाजपच्या भविष्यातील भूमिकेबाबात चर्चा झाल्याचे देखील ते म्हणाले. भाजपची सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थीतीवर भाजपच बारीक लक्ष असून योग्य वेळी योग्य भूमिका घेतली जाईल यासोबतच भाजपकडे प्रस्ताव आल्यास विचार करून निर्णय घेणार असल्याचेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात भाजप सत्तास्थापन करणार अशी चर्चा होतेय, यादरम्यान भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबत बैठकीत कोणतीही चर्चा नाही, असे मुनगंटीवार म्हणाले, बंडखोर स्वतःला शिवसैनिक मानत आहेत, मग बंडखोर कोण हे येणाऱ्या काळात कळेल, मी सेनेच्या कुठल्याही आमदाराला बंडखोर मानत नाही, शिंदेकडे 2/3 आमदार मग त्यांना बंडखोर कसं म्हणणार असेही ते म्हणाले आहेत.

भाजप शिंदे यांच्या संपर्कात आहेत का? यावर शिवसेना गटनेते एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसेच अविश्वास प्रस्ताव सध्या सादर करण्याची गरज वाटत नाही, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Visit : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; मुख्यमंत्र्यांना पत्रानंतर आता पुण्यातील उपोषणस्थळी देणार भेट

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

कोल्हापुरात ‘होम मिनिस्टर’चा डंका! २,५०० हून अधिक महिलांनी औक्षण करत रचला विश्वविक्रम

Marathi News Live Updates : राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

SCROLL FOR NEXT