Sugarcane FRP Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

Sugarcane FRP : उसाच्या 'एफआरपी'त प्रतिटन 250 ने वाढ; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पुढील वर्षी मिळणार 'इतका' दर

उसाच्या एफआरपीत प्रतिटन २५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केला.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर : पुढील वर्षीच्या साखर हंगामात उसाच्या एफआरपीत (योग्य आणि लाभदायी मूल्य) प्रतिटन २५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केला. या निर्णयामुळे पुढील वर्षीच्या हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रुपये दर मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तीन वर्षांत एफआरपीच्या तुलनेत साखरेच्या हमीभाव दरात वाढ नाही. त्यामुळे एफआरपीत वाढलेली रक्कम राहू देच, या वर्षाची एफआरपीसुद्धा (Sugarcane FRP Rate) देता येणार नाही, अशी स्थिती आहे.

उताऱ्याचा बेस १०.२५ टक्के कायम ठेवल्याने वाढीव दर कारखान्यांना (Sugar Factory) परवडणार नाही. यावर साखरेचे दुहेरी दर या धोरणाशिवाय पर्याय नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. केंद्राने साखर उद्योगास पूरक निर्णय घेतला; परंतु नैसर्गिक कारणामुळे यंदा साखर उत्पादन कमी होईल, असा अंदाज होता. त्यातून साखर निर्यात, इथेनॉल निर्मितीमधील पन्नास टक्के कपात असे निर्णय घेतले. फेब्रुवारी २०२४ मधील अंदाजापेक्षा साखर उत्पादन वाढेल. यामुळे देशातील साखर दर प्रतिक्विंटल ३७०० ते ३८०० वरून ३३५० ते ३४०० पर्यंत खाली आले.

हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे वाढलेले दर, इथेनॉलचे उत्पन्न याचा विचार करून बहुतांशी कारखान्यांनी यावर्षीच्या एफआरपीपेक्षा जादा दर जाहीर केले. तथापि गृहीत दर आणि आजची स्थिती यात मोठी तफावत आहे. परिणामी कारखान्यांसमोर यंदाच्या हंगामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा विचार न करता पुढील हंगामासाठी थेट प्रतिटन २५० एफआरपीतील वाढ केली आहे. साखर उत्पादन खर्च आणि मिळणारे एकूण उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. अशा स्थितीत एफआरपीत झालेली वाढ काखान्यांना देणे अडचणीचे ठरणार आहे.

साखर दर वाढीची मागणी

साखरेचा दर ३१०० रुपये होता, त्यावेळी २७५० रुपये एफआरपी होती. त्यानंतर चार वेळा एफआरपीमध्ये वाढ झाली; पण साखरेचे दर तेच राहिले आहेत. त्यात वाढ केली पाहिजे; अन्यथा त्याचा कारखान्यांना फटका बसणार आहे, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना दर कसा मिळणार, याविषयी संभ्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT