Jacqueline Fernandez, Sukesh Chandrasekhar  
महाराष्ट्र बातम्या

अण्णा द्रमुक पक्षाला फसवण्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखरला पुन्हा अटक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जॅकलिन फर्नांडीससोबत चर्चेत आलेला सुकेश चंद्रशेखरला (Sukesh Chandrasekhar) इडीने दुसऱ्यांदा अटक केली आहे. सुकेशने 215 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपी आहे. सध्या त्याला पुन्हा एकदा एका जुन्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. पाच वर्षे जुन्या एका प्रकरणामध्ये त्याला अटक झाली असून AIADMK चे नेते TTV दिनाकरण यांच्याशी निगडीत हे प्रकरण आहे.

ज्या प्रकरणी आता ईडीने सुकेशला अटक केली आहे, ते प्रकरण 2017 चे आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने सुकेशला अटक केली आहे. त्याने AIADMK चे नेते TTV दिनाकरण यांना असा विश्वास दिला होता की तो AIADMK पक्षाला दोन फुले आणि पाने असलेलं निवडणूक चिन्ह मिळवून देईल. याबदल्यानत त्याने त्यांच्याकडून 50 कोटी रुपये मागितले होते. सुकेशने म्हटलं होतं की, हे 50 कोटी रुपये निवडणूक आयोगातील बड्या अधिकाऱ्यांना लाच म्हणून दिले जातील.

यानंतर दिनाकरण यांनी जवळपास दोन कोटी रुपये सुकेशला पाठवले देखील होते. मात्र, दिल्ली पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी सुकेशला पकडलं त्यानंतर सीबीआयने दिनाकरण यांना देखील याप्रकरणी आरोपी बनवलं. कारण लाच देणं आणि घेणं हे दोन्हीही भारतात अपराध आहे.

गेल्या वर्षी ईडीने त्याला अटक केली होती. सुकेशने एका प्रकरणामध्ये स्वत:ची ओळख गृह मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाचा अधिकारी असल्याची करवून दिली होती. दिल्लीतील एका व्यापाऱ्याच्या पत्नीकडून 215 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपामध्ये त्याला त्यानंतर अटक करण्यात आली होती.

सुकेशने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि नोरा फतेहला देखील कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट्स दिले होते. तसेच आणखी तीन अभिनेत्री भूमी पेडणेकर, सारा अली खान आणि जान्हवी कपूरशी देखील त्याने संपर्क केला होता. सध्या या प्रकरणी त्याला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

Lonar Lake Development: पर्यटकांना मिळणार लोणार सरोवराची वैज्ञानिक व ऐतिहासिक माहिती

Ichalkaranji : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली अन्...

Fake Currency: धाड परिसरात बनावट नोटा चलनात; पोलिस व बँक प्रशासनाकडून आवाहनः व्यापारी व नागरिकांन सतर्क राहावे

SCROLL FOR NEXT