Thackeray Vs Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Thackeray Vs Shinde: आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; आधीच्या सुनावणीत काय घडलं?

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी धाव घेतली.

ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणी सोमवारी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यास नकार देऊन यावर मंगळवारी सुनावणी होईल असे जाहीर केलं आहे.

आधीच्या सुनावणीत काय घडलं?

राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. आधी हे प्रकरण व्हॅकेशन बेंचकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन न्यायाधीशांकडे हे प्रकरण आलं. १६ तारखेला झालेल्या सुनावणी दरम्यान निर्णय राखून ठेवला होता.

राज्यातील सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर गेल्या आठ महिन्यांपासून युक्तिवाद सुरू होता. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज कौल आणि मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

या सुनावणी दरम्यान, गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटकाचा दाखला दिला गेला. तसेच नबाम रेबिया प्रकरण आणि किहेतू प्रकरणाचे दाखलेही देण्यात आले. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शिंदे गटाच्या वकिलांना काही सवालही केले.

गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी झाली होती. यावेळी ठाकरे गटाने हे प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी केली. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवावे का? असा प्रश्न काल शिंदे गटाच्या वकिलांना करण्यात आला होता. पण शिंदे गटाच्या वकिलाने त्यावर काहीच भाष्य केलं नव्हतं.

सलग तीन दिवस सुनावणी होऊन सुद्धा कोर्टाने निकाल राखून ठेवला. कोर्ट हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे देण्याचा निर्णय घेणार की या प्रकरणावर थेट निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT