Eknath Shinde vs Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : सुप्रीम कोर्टाने दिलेली 'जैसे थे' स्थिती म्हणजे काय? ठाकरे गटाला असं मिळेल संरक्षण

संतोष कानडे

नवी दिल्लीः आज सकाळी सुप्रीम कोर्टामध्ये आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी झाली. याबाबत पुढील सुनावणी उद्या होणार आहे. मात्र दुपारनंतर जी सुनावणी झाली, त्यामध्ये ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयावर ठाकरे गटाने कोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नसली तरी जैस थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या जैसे थे परिस्थितीमध्ये शिंदे गटाला ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावता येणार नाहीये. ठाकरे गाटाच्या आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आता शिंदेंच्या शिवसेनेला असणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. त्यामुळे दोन आठवडे परिस्थिती जैसे थे असणार आहे.

याबरोबरच सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि शिंदे गटाला नोटीस पाठवण्याविषयी भाष्य केलं असून उभयतांकडून उत्तर मागवलं आहे. यासह बँक अकाऊंट आणि मालमत्तेवरील हक्काबाबत कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

निवडणूक आयोगाने मालमत्तेबाबत काहीही भाष्य केलं नसल्याने कोर्टाने त्यावर कुठलाच निर्णय दिला नाही. महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात कोर्टाने नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT