supriya sule answer quetion would you like to be first woman chief minister of the state  
महाराष्ट्र बातम्या

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर स्थानिक पदाधिकार्‍यांसह तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेतलं, यावेळी त्यांनी 'यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडू दे, महागाईपासून दिलासा मिळू दे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळू दे', असं साकडं त्यांनी तुळजाभवानी चरणी घातलं.

सुप्रिया सुळे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, खरंतर आपल्याला काय मिळाले, याबद्दल देवळात आभार मानण्यासाठी येत असते. देवळात येऊन काही मागू नये जे काही दिलंय ते आशिर्वाद समजून आभार मानायला यावं सगळे कार्यकर्ते आणि पंडित काहीतरी मागा म्हणत होते. त्यावेळी राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीचं राज्य येऊ दे. अडचणीत आलेला देशातला शेतकरी त्याला आनंद मिळू दे, असं साकडं घातलं, असं सुळे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?

महाराष्ट्राला पहिला महिला मुख्यमंत्री कधी मिळेल? तुम्हाला पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला अवडेल का? असा प्रश्न पत्रकारांना त्यांना विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याटं उत्तर माझ्याकडे नाहीये, मी काही जोतिषी नाहीये. मी मुख्यमंत्री व्हावं याबद्दल कधी विचार केला नाही. या प्रश्नाचं उत्तर जनता आहे. याचा निर्णय जनताच घेईल', असे त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT