महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : "ईडी सरकारचे फक्त रिवाइंड आणि प्ले काम" ; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर, शिवसेना कुणाची?, या  मुद्द्यांवर त्यांनी सरकारला सवाल केला. 

संतोष बांगर शिक्षकांना मारहाण, धमकी देणे या प्रकरणामुळे नेहमी चर्चेत असतात. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सगळं दुर्देव आहे. ईडी सरकार प्रशासनात कमी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत न बसणारे काम जास्त करतात. मला वाटते ते मोदीजींची भाषणे कमी ऐकतात. मोदीजी म्हणतात मी प्रधान सेवक आहे. सेवा सोडून हे लोक सगळेच काम करतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. 

हे सरकार ते रोजच आरोप करत आहेत. सहा महिने सत्तेत आल्यापासून या लोकांनी काहीच काम केलेलं नाही. स्वतःचं काही सांगण्यासारखे नाही त्यामुळे रिवाइंड आणि प्ले हे काम हे ईडी सरकार करत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. 

मुंबईत आज लिंगायत आणि सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एकतर मोर्चा म्हणजे सरकार विरोधात आहेत. हे असंवेदनशील सरकार आहे म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे. तसेच लव्ह जिहादचा अर्थ मला माहित नाही. लव्हचा अर्थ मला कळतो जिहादचा अर्थ मला कळत नाही."

उद्या ३० जानेवारीला शिवसेना पक्षाच्या चिन्हावर सुनावणी होऊ शकते. सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. "शिवसेना पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्याचा उत्तराधिकारी देखील त्यांनी स्वत: ठरवलेला आहे. त्यामुळे पक्षाचे चिन्ह वेगळ्या कुणाला तरी मिळणे, ते योग्य होणार नाही. ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी उत्तराधिकारी ठरवला. त्यांनाच ते चिन्ह मिळाले पाहीजे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाइट अन् लिंक व्हायरल; वेळीच सावध व्हा, नाहीतर बसेल मोठा फटका

Sunday Evening Snack: संध्याकाळच्या भूकेची करा अशी सोय, चहासोबत तयार करा लेफ्टओव्हर पोळीच्या बाकरवडी

Madhuri Elephant Return : महादेवी हत्तीण महाराष्ट्रात परत येणार? खासदारांनी कोल्हापूरकरांना दिली मोठी खुशखबर

Crime: 'फ्रेंडशिप डे'लाच मैत्रीच्या नात्याला काळिमा! मान दाबली, मांडीवर सिगारेटचे चटके अन्...; तरुणाचं मुलीसोबत संतापजनक कृत्य

धक्कादायक! 'ऊस देऊन आठ महिने उलटले तरी दमडी नाही'; जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतरही आडमुठेपणा, मुलांची शिक्षणे थांबली

SCROLL FOR NEXT