महाराष्ट्र बातम्या

Police: शस्त्रक्रियेदरम्यान पोलिस महिलेचा संशयास्पद मृत्यू; भूल अतिप्रमाणात देण्यात आल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कानावरील शस्त्रक्रिया सुरू करण्याआधी अचानक रक्तदाब खालावल्याने मुंबई पोलिस दलात शिपाई पदावर नियुक्त असलेल्या गौरी पाटील (वय २८) यांचा गुरुवारी अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. अतिप्रमाणात भूल दिल्याने गौरीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.

गौरी यांची शस्त्रक्रिया शुक्रवारी नियोजित होती. मात्र, रुग्णालयाने गुरुवारी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर गौरीचा रक्तदाब प्रमाणापेक्षा अधिक खालावल्याने डॉक्टरांनी तिला अतिदक्षता विभागात हलवल्यात आले होते. मात्र, त्यानंतर गौरीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.

यावेळी मृत्यूचे कोणतेही कारणही डॉक्टर किंवा रुग्णालयाने स्पष्ट केले नसल्याचा आरोप गौरी यांचे बंधू विनायक यांनी केला आहे. तसेच शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याच्या औषधाचा अति किंवा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, २०१७ मध्ये मुंबई पोलिस दलात रुजू झालेल्या गौरी सध्या हत्यारी विभागात (लोकल आर्म) नियुक्त होत्या. त्या कुटुंबीयांसोबत कांदिवली येथे वास्तव्यास होत्या. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. तसेच कुपर रुग्णालयात शवचिकित्सा झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

विविध कारणांचा शोध
सर्वसाधारणपणे रुग्णाचा पूर्वीचा वैद्यकीय इतिहास, सध्या त्यास जडलेल्या रक्तदाब, मधुमेह आदी व्याधी लक्षात घेऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जातो. भूलतज्ज्ञ रुग्णाचा इतिहास, सध्या ताप, खोकला, दम्याची उबळ नाही ना, याची खातरजमा करूनच रुग्णाला भूल देतात. मात्र, या प्रकरणात भूल देण्यावरून, त्याचे प्रमाण, रक्तदाब अचानक खालावण्याची कारणे अशा सर्व बाबींवर प्रश्‍न उपस्थित झाल्याने पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

शवचिकित्सेत मृत्यूचे कारण अस्पष्ट राहिल्यास व्हीसेरा तपासणीसाठी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोग शाळेत मृतदेह पाठवला जाईल. हे रुग्णालय पोलिस सूचीवरील असून मुंबई पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येथे मोफत इलाज केले जातात.
-जयवंत शिंदे, वरिष्ठ निरीक्षक, अंबोली पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT