Swine-Flu
Swine-Flu 
महाराष्ट्र

हवामान बदलामुळे स्वाइन फ्लूचा फैलाव

सकाळवृत्तसेवा

मुंबई - वातावरणातील बदलांमुळे राज्यात काही ठिकाणी स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत आहे. महिन्याभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी विभागाने पाच कलमी कार्यक्रम राबवावा, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

राज्यात स्वाइन फ्लूने १ ते २४ जानेवारी या कालावधीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एक लाख ७७ हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७६४ संशयित रूग्णांना ऑसेलटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्या असून बाधीत रूग्णांची संख्या ६६ एवढी आहे. नागपुरात चार, कोल्हापूर, पुणे येथे प्रत्येकी दोन असे आठ रूग्ण दगावले आहेत.

सध्या राज्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवत आहे. काही भागात पाऊसदेखील पडला आहे. हे वातावरण स्वाईन फ्लूचे विषाणू फैलावण्यासाठी पोषक असल्याने रूग्णांची संख्या वाढत आहे. एरव्ही राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तर फेब्रुवारी आणि मार्च या काळात रूग्ण आढळून येतात. यावर्षी मात्र जानेवारी महिन्यामध्ये हवामान बदलाचा परिणाम म्हणून स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील सर्व उपजिल्हा तसेच जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्लू उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

टाटा ट्रस्टसारख्या अन्य सामाजिक संस्थांची मदत याकामी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर निधीतून मेळघाटमध्ये आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी ॲक्‍शन प्लॅन तयार करावा, असे निर्देश शिंदे यांनी दिले.

बालमृत्यू रोखण्यासाठी ॲक्‍शन प्लॅन 
मेळघाटमधील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महिला व बालविकास, आदिवासी विकास, अन्न व नागरी पुरवठा आदींसह अन्य विविध विभागांशी समन्वय साधून आवश्‍यक त्या उपाययोजनांचा ‘मेळघाट ॲक्‍शन प्लॅन’ तातडीने तयार करावा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT