खर्च करण्याचे नियोजन करा esakal
महाराष्ट्र बातम्या

चहा-नाष्टा, जेवण, नारळ, हार, शालीचा दर निश्चित! वाचा कोणत्या वस्तूचा दर किती? अर्ज भरल्यापासून द्यावा लागणार हिशोब; प्रत्येक उमेदवाराला ९५ लाखांच्या खर्चाची मर्यादा

स्थानिक बाजारपेठांचे सर्वेक्षण करून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात चहा, नाष्टा, जेवण, स्पेशल थाळी, राहण्याची खोली, पाणी बाटली, नारळ, शाल, पुष्पहार, सतरंजी, पक्षांचे झेंडे, पताका, बॅनर याचे दर किती असावेत हे जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ९५ लाखांपर्यंतच खर्च करता येणार आहे. स्थानिक बाजारपेठांचे सर्वेक्षण करून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात चहा, नाष्टा, जेवण, स्पेशल थाळी, राहण्याची खोली, पाणी बाटली, नारळ, शाल, पुष्पहार, सतरंजी, पक्षांचे झेंडे, पताका, बॅनर याचे दर किती असावेत हे जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केले आहेत. त्यानुसारच खर्च करणे व त्याचा हिशोब देणे उमेदवारांसाठी बंधनकारक असणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब देताना उमेदवारास बिस्कीटसाठी पाच ते दहा रुपयास एक पॉकेट अशा निश्चित दरातच खर्च करून त्याचा हिशोब जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. तसेच निवडणूक काळातील फटाक्यांचे शॉट, रिक्षासह विविध वाहने, प्रचाराचे पोस्टर, हॅण्डबिल, बॅनर, पोस्टर, डिजिटल बॅनर, पेन्डॉल, सतरंजी, टेबल, सोफासेट, खुर्ची, मंडप, फुलांचा हार लहान-मोठा, लाइट फिटिंग, जनरेटर, फेटा, शाल, मफलर, टोपी, गांधी टोपी, कापडी झेंडा, हॉटेल, लॉजवरील राहणे व तेथील जेवण अशा विविध बाबींचे दर सध्याची महागाई विचारात घेऊन निश्चित करण्यात आले आहेत. पण, शहरी व ग्रामीण भागात बऱ्याच बाबींचे दर सारखेच असून बहुतेक मतदार ग्रामीणमध्येच आहेत. तरीसुद्धा निवडणुकीसाठी उमेदवारांना मर्यादितच खर्च करावा लागणार आहे.

असे राहणार खर्चाचे बंधन...

  • फटाक्यांची माळ (१ ते ३ हजार फटाके) : ४५० ते २०००

  • प्रचारातील रिक्षा भाडे : प्रतिदिन १३३०

  • चहा : शहरात १० तर ग्रामीणमध्ये ८ रुपये

  • कॉफी व दूध : शहरात १५ तर ग्रामीणमध्ये १० रुपये

  • नाष्टा : ३० रुपये

  • कोल्ड्रिंक्स : २० रुपये

  • मिनरल वॉटर बॉटल बॉक्स : ८० रुपये

  • पाणी जार : ३० रुपये

  • निंबुपाणी : प्रतिग्लास १० रुपये

  • उसाचा रस : प्रतिग्लास शहरात २५ तर ग्रामीणमध्ये १५ रुपये

  • व्हेज थाळी : शहरात ९० तर ग्रामीणमध्ये ७५ रुपये

  • स्पेशल व्हेज थाळी : शहरात १८० तर ग्रामीणमध्ये १५० रुपये

  • नॉनव्हेज थाळी : १५० ते १२० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

T20 WC: फखरची साथ अन् फरहानने मोडला विराटचा १२ वर्षे जूना विश्वविक्रम! पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेला घरच्या मैदानातच रडवलं

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

SCROLL FOR NEXT