mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! २२ जून २०१७ नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांची होणार चौकशी; उपसंचालकांची त्रिसदस्यीय समिती न नेमली, ‘या’ शिक्षकांची पगार थांबणार, वाचा...

शिक्षक भरतीसाठी २२ जून २०१७ पासून पवित्र पोर्टल सुरू झाले. मात्र, पोर्टल काही दिवस अकार्यान्वित असताना राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सुमारे आठ हजार शिक्षकांची भरती झाल्याची बाब आता समोर आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शिक्षक भरतीसाठी २२ जून २०१७ पासून पवित्र पोर्टल सुरू झाले. मात्र, पोर्टल काही दिवस अकार्यान्वित असताना राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सुमारे आठ हजार शिक्षकांची भरती झाल्याची बाब आता समोर आली आहे. या शिक्षकांच्या मान्यतेसह संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

नागपूरमध्ये ६५०, नाशिकमध्ये ८०० तर अन्य जिल्ह्यांमध्ये देखील शेकडो शिक्षकांच्या शालार्थ आयडीचा घोळ समोर आला आहे. त्यानंतर राज्यातील १७ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील तीन लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. मुख्याध्यापकांकडून त्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. राज्य शासनाने या चौकशीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ नेमली आहे.

समितीला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. समितीच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता, संस्थेचा रुजू रिपोर्ट, शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश, शालार्थ आयडी अशा कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आता दुसरीकडे २२ जून २०१७ पासून पवित्र पोर्टलशिवाय भरती झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी विभागीय उपसंचालक व दोन शिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमली जाणार आहे. १५ मे २०२६ पर्यंत समितीने त्यांचा अहवाल शासनाला सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

उपसंचालकांच्या समितीमार्फत होईल पडताळणी

२२ जून २०१७ पासून खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती पवित्र या संगणकीय प्रणालीमार्फत होणे आवश्यक होती. मात्र, सात ते आठ हजार पदांची भरती पवित्र पोर्टलशिवाय झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता विभागीय उपसंचालकांच्या माध्यमातून या सर्वांची पडताळणी होईल.

- डॉ. श्रीराम पानझडे, शिक्षण सहसंचालक, माध्यमिक शिक्षण, पुणे

...तर त्या शिक्षकांचे थांबणार वेतन

अनेक खासगी अनुदानित शाळांनी त्यांच्याकडील मंजूर पदांपेक्षा जास्त पदे भरली आहेत. त्यांना शालार्थ आयडी देखील मिळाला असून, ते सध्या वेतन घेत आहेत. दुसरीकडे, शिक्षणाधिकारी कार्यालय किंवा उपसंचालक कार्यालयाकडील रजिस्टरमध्ये जावक नोंद नाही, तरीपण काही शिक्षकांकडे वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीचे आदेश आहेत. गैरप्रकार होऊ नयेत म्हणून शालेय शिक्षण विभागाने सर्वच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे डिजिटायझेशन केले आहे. मात्र, आणखी शेकडो शिक्षकांनी त्याची पडताळणी केलेली नाही. अशा सर्व बाबींची अंतिम पडताळणी होणार असून, त्यानंतर संबंधितांचे वेतन थांबविले जाणार आहे.

माध्यमिक शाळा-शिक्षकांची स्थिती

  • एकूण शाळा

  • १७,२००

  • कार्यरत अंदाजे शिक्षक

  • २.९६ लाख

  • ‘शालार्थ आयडी’तील संशयित शिक्षक

  • १,५००

  • पवित्र पोर्टलशिवाय भरलेले शिक्षक

  • ८,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

SCROLL FOR NEXT