महाराष्ट्र

दहा रुपयांचे नाणे बंद होणार नाही 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - दहा रुपयांचे नाणे बंद होणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी 10 रुपयांची नाणी बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी धाव घेतली. मात्र दहा रुपयांचे नाणे बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करताना रिझर्व्ह बॅंकेने या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. 

नोटाबंदीच्या काळात चलनी नोटांचा पुरवठा मर्यादित असताना दहा रुपयांच्या नाण्यांचे वितरण वाढले होते. मात्र लवकरच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांप्रमाणे दहा रुपयांची नाणी रद्द केली जाणार असल्याचे संदेश व्हॉट्‌सऍपवर पसरले आहेत. या संदेशांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी आपल्याकडील दहा रुपयांची नाणी बॅंकांमध्ये जमा करण्याचा पर्याय निवडला आहे. 

याबाबत रिझर्व्ह बॅंकेशी संपर्क साधला असता बॅंकेने, हा संदेश अफवा असून, दहा रुपयांचे नाणे बंद होणार नाही. यापुढेही दहा रुपयांची नाणी चलनात कायम राहील, असे स्पष्ट केले. नोटाबंदीच्या काळातही अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर 21 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बॅंकेने दहा रुपयांचे नाणे चलनात कायम असल्याबद्दल अध्यादेश जारी केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का! पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद

SCROLL FOR NEXT