eknath shinde devendra fadnavis ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Nagaradhyaksh : मोठी बातमी! आता नगराध्यक्षांचा कार्यकाळ बदलला, अडीच वर्षावरून झाला....; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

cabinet meeting decision today : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांच्या कालावधीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

रोहित कणसे

आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्ष करण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी ५ वर्षे करण्याला मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी अडीच-अडीच वर्ष असे दोन नगराध्यक्ष पाच वर्षांत होत होते. आता एकाच नगराध्यक्षाचा काळ पाच वर्षांचा असणार आहे.

मंत्रिमंडळाच्या या बैठकीत विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी पशूसंवर्धन व दुग्धविकास यासाठी १४९ कोटीस मान्यता देण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या निर्णयाचा मराठवाड्यातील लाखो नागरिकांना लाभ होणार आहे.

डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन दिले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सुधारित ३७ हजार कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

IND vs WI, 1st Test Video: ध्रुव जुरेलच्या विकेटकिपिंगने जिंकली मनं! सूर मारत चेंडू आडवत टीकाकारांना दिलं उत्तर

Shivsena Dasara Melava: ''...ही गोष्ट मान्य केली पाहिजे'', लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे भाजपवर बोलले

Dussehra Melava 2025 Live Update: हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का?- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT