accident news 
महाराष्ट्र बातम्या

Accident : ‘समृद्धी’वर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू तर आरोपी...

रवींद्र देशमुख

वर्धा - परभणी येथून आरोपी घेऊन नागपूर येथे जाणारे हरियाणा राज्यातील पंचकुला येथील पोलिसांचे वाहन ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पांढरकवढा गावानजीक सकाळी ही घटना घडली. अपघातात महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी झाला आहे.

नेहा चव्हाण असे मृत पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.

हरीयाणा येथील पंचकुला पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे तीन कर्मचारी परभणी येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेऊन एचआर. ०३ जी.व्ही. १७८२ क्रमांकाच्या बोलेरो पोलिस वाहनाने नागपूरकडे जात होते. समृद्धी महामार्गाने जात असताना पांढरकवडा गाव परिसरात पोलिस वाहन समोरील ट्रकला पाठिमागून धडकले.

या भीषण अपघातात पोलिस वाहनाचा समोरील भाग चकनाचूर झाला. या अपघातात पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलिस कर्मचारी व आरोपी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक, संदीप खरात हे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. तसेच जाम महामार्ग पोलिसही अपघातस्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तसेच आरोपी ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली.

घटनास्थळी जावून सावंगी पोलिसांनी अपघातग्रस्त पोलिस वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्याकडे असलेली १ ग्लॉक ९ एमएम पीस्टल आणि १५ राऊंड सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

Ray-Ban Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केले कॅमेरा नसलेले नवे स्मार्ट ग्लासेस; Muse AI एजंटसह 'म्युझ चार्म' डिव्हाइस बाजारात...

SCROLL FOR NEXT