Abdul Sattar esakal
महाराष्ट्र बातम्या

TET परीक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं नाव, माजी मंत्र्यांनी आरोप नाकारले

धनश्री ओतारी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे कनेक्शन आता सिल्लोडपर्यंत पोहचले आहे. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बोलताना सत्तार यांनी बदनामी करण्यासाठी कट रचला जातोय असा आरोप केला आहे. (TET scam case Certificates of Abdul Sattar's two daughters cancelled)

परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे.

हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून 2020 मध्ये त्या अपात्र आहेत सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे.

याप्रकरणी बोलताना सत्तार यांनी बदनामी करण्यासाठी कट रचला जातोय असा आरोप केला आहे. मुलींची चुक असेल तर बिनधास्त कारवाई करा. बदनामी करणाऱ्यांना फासावर लटकवा. या प्रकरणाची नीट चौकशी करा अशी मागणी करत सत्तार यांनी बदनाम करण्याचे काम कुणीही करु नये. सर्वांनी आपापल्या पद्धतीने दक्षता घ्यावी. याची सर्व विचारपूस करण्यासाठी शिक्षण अधिकारी आहेत. त्यांच्याकडे यासंदर्भात तक्रार गेली असेल. जर त्यामध्ये नावं आढळल्याच आम्ही जबाबदार आहोत. पण चुकीची माहिती देऊन बदनामी करण्यात येत असेल तर त्याच्यावर धडक कारवाई करावी अशी प्रतिक्रिया देत सत्तार यांनी मुलींवर झालेले आरोप नाकारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या मार्गातील 'मोठा' अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेशास २८ पर्यंत मुदतवाढ

Pune News : राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याचे विश्लेषण व तुलना करावी; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

कॅन्सरला हरवलं पण मृत्यूशी झुंज अपयशी; 'रेडी' फेम अभिनेत्री प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT