onion esakal
महाराष्ट्र बातम्या

बाजार समितीतील लिलाव बुधवारी राहणार बंद! सोमवारी 501 गाड्या कांदा; सरासरी भाव 2 हजार रुपयावर; बाजार समितीच्या प्रशासकांकडून 11 व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

विधानसभेच्या मतदानामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बुधवारी (ता. २०) बंद राहणार आहेत. सोमवारी (ता. १८) बाजार समितीत ५०१ गाड्या कांदा आला होता. त्यासाठी सरासरी भाव दोन हजार रुपयांपर्यंतच मिळाल्याचे पाहायला मिळाले.

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभेच्या मतदानामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बुधवारी (ता. २०) बंद राहणार आहेत. सोमवारी (ता. १८) बाजार समितीत ५०१ गाड्या कांदा आला होता. त्यासाठी सरासरी भाव दोन हजार रुपयांपर्यंतच मिळाल्याचे पाहायला मिळाले.

सोलापूर बाजार समितीत सोलापूरसह बीड, नाशिक, नगर, कर्नाटक, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील कांदा विक्रीसाठी येतो. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेला सुरवातीचा कांदा खराब झाला आणि शेतकऱ्यांना आहे तसाच कांदा शेतात सोडून द्यावा लागला. दुसरीकडे खराब झालेला कांदा विकायला आणला, पण तो ३० पैसे, ५० पैसे किलो दराने कांदा विकावा लागला. अनेक शेतकऱ्यांचा खर्च देखील निघाला नाही, अशी वस्तुस्थिती पाहायला मिळाली.

आता खराब कांदा कमी प्रमाणात असून नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. पण, ओला कांदा असल्याने त्याला प्रतिक्विंटल दोन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. चांगला दर्जेदार कांदा असेल तर त्याला साडेतीन, चार हजार रुपयांपर्यंत कांदा विकला जातोय. सोमवारी (ता. १८) बाजार समितीत एक लाख २२२ पिशव्या (५०,१११ क्विंटल) कांदा विक्रीसाठी आला होता. त्यातील ५० हजार ७८ क्विंटल कांदा सरासरी दोन हजार रुपयांनी विकला गेला. दरम्यान, आता चांगला कांदा बाजारात येत असल्याने डिसेंबरपासून कांद्याला आणखी भाव वाढेल, असा विश्वास बाजार समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

‘या’ ११ व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील ११ व्यापाऱ्यांनी मागील एक वर्षापासून कांद्याचे पैसे दिले नव्हते. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यापाऱ्यांना पैसे द्यायला सांगितले, पण त्यांनी पैसे दिलेच नाहीत. यावर ‘सकाळ’ने सतत पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांनी या ११ आडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले आहेत. त्यांच्याशी कोणीही व्यवहार करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT