onion esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात कांद्याला प्रतिक्विंटल ३१०० रुपयांचा सरासरी भाव! आवक घटल्यावरही भाव ‘जैसे थे’; लसूण, टोमॅटो, वांगी, मिरची, गवारी, कोथिंबीर, मेथीचे दर, वाचा सविस्तर

सोलापूर उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी ६१,७१८ पिशव्या कांदा आला होता. यंदाचा कांदा हंगाम सुरू झाल्यापासूनचा सर्वाधिक दर मंगळवारी शेतकऱ्यांना मिळाला, तोही अवघ्या सहा क्विंटलसाठीच सात हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. तर सरासरी दर तीन हजार १०० रुपयांपर्यंत होता.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ५) ६१ हजार ७१८ पिशव्या कांदा विक्रीसाठी आला होता. त्यातून साडेनऊ कोटींची उलाढाल झाली आहे. यंदाचा कांदा हंगाम सुरू झाल्यापासूनचा सर्वाधिक दर मंगळवारी शेतकऱ्यांना मिळाला, तोही अवघ्या सहा क्विंटलसाठीच सात हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. तर सरासरी दर तीन हजार १०० रुपयांपर्यंत होता.

मागील दोन दिवसांत सोलापूर बाजार समितीत साडेसहाशे गाड्या कांदा विक्रीसाठी आला आहे. गतवर्षी निर्यातबंदीमुळे कमी भावाने कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना यंदा तरी चांगला मिळेल अशी आशा आहे. पण, पावसामुळे बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा काढण्यापूर्वीच खराब झाला. त्यामुळे सध्या बाजारात आवक कमी झाली आहे. जिल्ह्यातील अंदाजे २८ हजार हेक्टरवर यंदा कांद्याची लागवड झाली असून पावसामुळे कांदा खराब झाल्याने त्या शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा लागवड केली आहे. नाशिकनंतर सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल मोठी आहे. गतवर्षी केवळ कांद्याची उलाढाल साडेबाराशे कोटींची होती. यंदाही एवढीच उलाढाल अपेक्षित आहे, पण शेतकऱ्यांना परवडेल इतका दर मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मंगळवारची बाजार समितीतील स्थिती

  • एकूण आवक

  • ३०८ गाड्या

  • प्रतिक्विंटल किमान दर

  • ५०० रुपये

  • कमाल दर

  • ७,१०० रुपये

  • सरासरी भाव

  • ३,१००

अन्य भाजीपाल्यांचे प्रतिकिलो दर

  • लसूण

  • २३७ ते ३२० रुपये

  • टोमॅटो

  • १५ ते २८ रुपये किलो

  • वांगी

  • १८ ते ४० रुपये

  • मिरची

  • २२ ते २५ रुपये

  • गवारी

  • ५० ते ७५ रुपये

  • कोथिंबीर पेंडी

  • १२ ते १६ रुपये

  • मेथी पेंडी

  • १५ ते १९ रुपये

कांदा विकल्यावर लगेच मिळावेत पैसे

कांदा लागवडीपूर्वी शेतीची मशागत, खते-बियाणे, लागवड, पुन्हा फवारणी, खुरपणी आणि शेवटी कांदा काढून चिरून पिशवीत भरून बाजार समितीत आणायला एकरी किमान ८० हजारांपर्यंत खर्च होतो. अनेकांचे पैसे शेतकऱ्यांनी कांदा विकल्यावर देतो म्हणून थांबविलेले असतात. पण, कांदा विकूनही शेतकऱ्यांना सोलापूर बाजार समितीत अवघे १५ हजार रुपये रोख दिले जातात आणि उर्वरित रकमेचा धनादेश दिला जातो. त्यावरील मुदत १५ ते २० दिवसांची असते अशी वस्तुस्थिती आहे. किमान एका आठवड्यात तरी सगळे पैसे मिळावेत, अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT