Cabinet Expansions Esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansions: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली! शिंदे गटाला मिळणार न्याय?

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत रात्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकिय निवास स्थानी बैठक झाल्याची चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. शिंदे गटातील आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदाकडे आस लावून बसले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे ९ आमदार या महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक आमदारांच्या मंत्रीपदाला कात्री लागण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

सत्ताधाऱ्यांकडूनही वारंवार मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या आठवड्यात विस्तार होईल असं सांगितलं जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केलं आणि सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे त्यांच्यासह 8 सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तर आता भाजप-शिवसेना- अजित पवार गट यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

तर युती सरकारच्या पुढील विस्ताराची तारीख ठरल्याची माहीती आहे. ९ जुलै किंवा १० जुलै रोजी उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा युती सरकारचा मानस आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसाठी मिळालेल्या संबधित खात्यांची माहिती असावी याअनुशंगाने आता हालचालींना वेग आलेला आहे.(Latest Marathi News)

मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत काल रात्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकिय निवासस्थानी बैठक झाली आहे. उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप व शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT