घरकुल  e sakal
महाराष्ट्र बातम्या

घरकुलाचा खर्च २.२५ लाख रुपये अन्‌ अनुदान १.२० लाख रुपये! लाभार्थींना पहिला हप्ता मिळूनही बांधकामे थांबलेलीच; मोदी आवास योजनेला नाही निधी

घरकुल बांधकामासाठी मूळ अनुदान एक लाख २० हजार रुपयांपर्यंतच मिळते. पण, बांधकामासाठी सव्वादोन लाख रुपयांचा खर्च येतो, असे बांधकाम सूचित नमूद आहे. वाळू मिळत नाही, स्टीलचा खर्च ५५ रुपये किलो आणि सिमेंटचे दरही जास्तच आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : घरकुल बांधकामासाठी मूळ अनुदान एक लाख २० हजार रुपयांपर्यंतच मिळते. पण, बांधकामासाठी सव्वादोन लाख रुपयांचा खर्च येतो, असे बांधकाम सूचित नमूद आहे. वाळू मिळत नाही, स्टीलचा खर्च ५५ रुपये किलो आणि सिमेंटचे दरही जास्तच आहेत. बांधकाम मजुरी देखील वाढलेली आहे. त्यामुळे साडेचार हजार लाभार्थींनी दहा वर्षानंतरही घरकुल बांधलेले नाही. तर सध्या पहिला, दुसरा हप्ता मिळूनही अनेकांची घरे पैशांअभावी अर्ध्यावरच थांबली असून काहींनी अजूनही बांधकामाला सुरवात केलेली नाही.

आवास योजनेतून लाभार्थींनी किमान २० बाय १३.५ फूट बांधकाम करणे अपेक्षित असून छतावर पत्रा टाकला तरी चालतो. त्या लाभार्थींनी रोजगार हमी योजनेअंतर्गत काही मजूर लावून काम केल्यास त्या मजुरांना प्रतिदिन २९७ रुपयांप्रमाणे ९० दिवसांची २६ हजार ७३० रुपयांची मजुरी दिली जाते. मात्र, अनेक लाभार्थी घर एकदाच होतं, पुन्हा पुन्हा होत नाही म्हणून क्षेत्रफळ मोठे घेतात. पुढे खर्च वाढतो, पैसा कमी पडतो आणि बांधकाम थांबते अशीही काही उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर आता ५० हजार रुपयांचे जादा अनुदान देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, पण शासन निर्णय नसल्याने लाभार्थींना वाढीव अनुदानाची खात्री वाटत नाही.

घरकुलाचा खर्च अन्‌ मिळणारे अनुदान

  • बांधकाम सुचीनुसार घरकुलाचा खर्च : २.२५ लाख

  • सध्याचे घरकुल अनुदान : १.२० लाख रुपये

  • रोजगार हमीतून मिळणारे अनुदान : २६ हजार ७३० रुपये

  • शौचालयासाठी अनुदान : १२००० रुपये

जिल्ह्यातील बेघर कुटुंबांची स्थिती

  • अंदाजित बेघर लाभार्थी : १.५० लाख

  • आता मंजूर लाभार्थी : ६२,९००

  • पहिला हप्ता वितरित : ५७,८०० लाभार्थी

  • पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा : ५,१०० लाभार्थी

मोदी आवास योजनेला ब्रेक

२०२३-२४ या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार १९ बेघर लाभार्थींना मंजुरी देण्यात आली. त्यांना पहिला, दुसरा हप्ता वितरित करण्यात आला. त्यातील बहुतेक जणांचे बांधकाम सुरू आहे. पण, २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा ग्रामीण यंत्रणेने ११ हजार १९ घरकुलांना मंजुरी दिली. मात्र, या लाभार्थींना अद्याप अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे त्या लाभार्थींना हक्काच्या निवाऱ्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Nanded Crime: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे भोवले! वाई बाजारच्या पूजा मेडिकल्स परवाना निलंबित; सहाय्यक आयुक्तांची कारवाई!

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT