अकरावी प्रवेश Esakal
महाराष्ट्र बातम्या

अकरावी प्रवेशाची मंगळवारी पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांना 65 टक्के गुण असूनही विज्ञान शाखेलाच पसंती; शिक्षणाधिकाऱ्यांचे महाविद्यालयांना ‘हे’ आदेश

दहावीच्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या शाखांमध्ये अर्ज केले आहेत. त्याची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. दहावीत ६५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही विज्ञान शाखेसाठीच अर्ज केल्याची स्थिती आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दहावीच्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या शाखांमध्ये अर्ज केले आहेत. त्याची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी (ता. १८) प्रसिद्ध होणार आहे. दहावीत ६५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही विज्ञान शाखेसाठीच अर्ज केल्याची स्थिती आहे. कला शाखेला विद्यार्थ्यांची फारशी पसंती नसल्याची स्थिती सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ६३ हजार विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत, पण कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील प्रवेश क्षमता ७० हजारांपर्यंत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास त्यांच्या आवडीच्या शाखेतून प्रवेश मिळणार आहे. विज्ञान शाखेसाठी जिल्हाभरात ३२ हजार जागा असून, वाणिज्य शाखेत २३ हजार ५०० आणि कला शाखेची १७ हजारांपर्यंत प्रवेश क्षमता आहे.

दरम्यान, ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’मुळे दहावीतील अनेक विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांवर गुण मिळाले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आपला मुलगा विज्ञान शाखेतूनच शिकावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ‘विनाअनुदानित’चे शैक्षणिक शुल्क भरण्याचीही अनेकांची तयारी आहे. त्यामुळे ‘अनुदानित’च्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर विनाअनुदानितचे मेरिट देखील वाढलेलेच असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

‘विनाअनुदानित’चे शुल्क ठरविण्याचा संस्थांना अधिकार

शासकीय अनुदानित ज्युनिअर महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळतील, त्यांच्याकडून कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. पण, विनाअनुदानित तुकड्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल त्यांना संबंधित संस्थेने ठरविलेले शुल्क भरावे लागेल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे. पण, हे शुल्क पालक- शिक्षक संघाच्या बैठकीत निश्चित झालेले असेल, असेही ते म्हणाले.

प्रवेशावेळी जवळ ठेवा ‘ही’ कागदपत्रे

गुणवत्ता यादीत नंबर लागल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना सोबत ओरिजनल गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा ओरिजनल दाखला आणि त्याची एक- एक प्रत झेरॉक्स, जातीचा दाखला असल्यास पोच पावती किंवा दाखला असल्यास त्याची झेरॉक्स प्रत जोडावी लागते. काही प्रवेशासाठी नॉनक्रिमिलियर व डोमिसाईल प्रमाणपत्र देखील जरुरी आहे.

-------------------------------------------------------------------------

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

  • पहिली गुणवत्ता यादी : १८ जून

  • पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : १८ ते २५ जूनपर्यंत

  • दुसरी गुणवत्ता यादी : २७ जून

  • दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : २७ जून ते ४ जुलैपर्यंत

  • तिसरी गुणवत्ता यादी : ५ जुलै (८ जुलैपर्यंत प्रवेश)

  • विशेष प्रवेश फेरी : ९ ते १२ जुलैपर्यंत

नियमबाह्य शुल्क विद्यार्थ्यांकडून घेवू नये

अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आता सुरू असून निश्चित वेळापत्रकानुसार १८ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे काढून ठेवावीत. अनुदानित संस्थांनी प्रवेश देताना कोणतेही नियमबाह्य शुल्क विद्यार्थ्यांकडून घेवू नये. विनाअनुदानित तुकड्यांमधील प्रवेशाचे शुल्क देखील अवास्तव नसावे.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

‘शासकीय तंत्रनिकेतन’साठी ५७० जागा

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट शासकीय तंत्रनिकेतनसाठी (पॉलिटेक्निक) प्रवेश घेता येतो. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ५७० जागा आहेत. आतापर्यंत त्याठिकाणी ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. प्रवेश अर्जासाठी २५ जूनपर्यंत मुदत असून विद्यार्थ्यांना https://poly24.dtemaharashtra.gov.in/diploma24 या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज करता येतो. विद्यार्थ्यांना अर्ज केल्यावर त्यासोबत जोडलेली कागदपत्रे घेऊन तंत्रनिकेतनमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

प्रेमानंद महाराजांना भेटल्यास ढसाढसा रडली पूनम पांडे, नेटकरी म्हणाले...'आधी सगळं करुन बसली आणि आता..'

Latest Marathi News Live Update : राष्ट्रपती मुर्मूंनी घेतलं गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन

Viral Video: ‘संस्कार’ म्हणजे काय ते दाखवलं! वडिलांचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

SCROLL FOR NEXT