mla nitesh rane  sakal
महाराष्ट्र बातम्या

जामीनानंतर राणे कुटुंबियांकडून आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'ही वेळ...'

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणेंना जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने संतोष परब हल्ला प्रकरणी त्यांना दिलासा दिला आहे. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. (Bail Granted to Nitesh Rane)

यानंतर आता राणे कुटुंबियांकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. निलेश राणे यांनी या जामीनासंदर्भात बोलताना म्हटलंय की, आनंद वाटतोय. कोर्टाची प्रोसिजर होती त्यात आज बेल मिळाला आहे. काय काय घडलं त्यावर बोलायची ही आजची वेळ नाही. आज आनंदाचा दिवस आहे. जामीन मंजूर केलाय त्याचा आनंद आहे.

राजकीय आकसाने ही कारवाई होतेय का? यावर ते म्हणाले की, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. हे आज कळलं आहे. बाकी गोष्टी वेळ आल्यावर बोलूच, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी नितेश राणेंना जामीन मंजूर केला आहे. ४ फेब्रुवारीला राणेंनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणी ८ रोजी पूर्ण झाली होती. अखेर न्यायालयाने निर्णय दिला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर राणेंना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार होतं. मात्र त्यांची प्रकृती खालवल्याने कोल्हापुरला हालण्यात आलं होतं. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, मंत्री नारायण राणे दिल्लीतील संसदीय अधिवेशनातून थेट सिंधुदूर्गमध्ये दाखल झाले होते. (Nitesh Rane News Update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update :दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी विदेश दारू जप्त

Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT