Ujjani Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

भीमा नदीतील पाण्यामुळे सीनेचा पूर ओसरेना! सोलापूर-विजयपूर महामार्ग आजही बंदच राहणार; उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

सीना नदीचा महापूर ओसरला असून सध्या नदीत ४५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे उजनीतून सोडलेल्या पाण्याचा २५ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत आहे. पण, वडकबाळजवळील हत्तूर परिसरात सोलापूर-विजयपूर महामार्गावर अजूनही पाणी आहे. त्यामुळे उद्याही (बुधवार) हा महामार्ग वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सीना नदीचा महापूर ओसरला असून सध्या नदीत ४५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे उजनीतून सोडलेल्या पाण्याचा २५ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत आहे. पण, वडकबाळजवळील हत्तूर परिसरात सोलापूर-विजयपूर महामार्गावर अजूनही पाणी आहे. त्यामुळे उद्याही (बुधवार) हा महामार्ग वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे.

सीना नदीत दीड लाखांचा तर भीमा नदीत सव्वालाखाचा विसर्ग सुरू होता. तो आता कमी झाला तरी त्याचा परिणाम जाणवायला १० ते १४ तास लागतात. त्यामुळे उद्या (बुधवारी) सायंकाळी सहानंतर वडकबाळजवळील पाणी ओसरले, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सीना-भीमा नदीच्या संगमावर भीमा नदीत मोठा विसर्ग असल्याने सीनेचे पाणी पुढे जात नाही. त्यामुळे हत्तूरजवळील महामार्गावर मंगळवारी (ता. ३०) पाणी होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्या महामार्गावरील वाहतूक सुरू केली नाही. सध्या या महामार्गावरील वाहतूक कामती-तेरामैलमार्गे पुढे सोडली जात आहे. हत्तूरजवळ महामार्गावर पाणी असल्याने वडकबाळ पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे.

उजनीतून २० वर्षांनंतर सोडले २०० टीएमसी पाणी

उजनी धरणातून २००५ मध्ये भीमा नदीद्वारे ३५३ टीएमसी पाणी सोडून देण्यात आले होते. त्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात २०० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. अजूनही उजनीतून भीमा नदीत विसर्ग सुरूच आहे. पहिल्यांदा २० जून रोजी उजनी ९० टक्के भरल्यावर भीमा नदीत पाणी सोडायला सुरू झाले होते. धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पातून सुमारे १० कोटींहून अधिक रुपयांची वीज तयार झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT