MPSC esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC वयोमर्यादा वाढीला आचारसंहितेची बाधा! अर्जाची वाढेल मुदत

MPSC वयोमर्यादा वाढीला आचारसंहितेची बाधा! अर्जाची वाढेल मुदत

तात्या लांडगे

कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा होऊ शकल्या नाहीत. या काळात काही उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून परीक्षा होऊ शकल्या नाहीत. या काळात काही उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली. त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची वाढीव संधी मिळावी म्हणून राज्य सरकारने (Maharashtra State Government) एक वर्षाची वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, परंतु अजून शासन निर्णय निघाला नाही. आज (मंगळवारी) संयुक्‍त पूर्व परीक्षा 'गट-ब'साठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे. परंतु, विधान परिषदेची (Legislative Council) आचारसंहिता असल्याने त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे अभिप्राय मागविण्यात आला आहे. शासन निर्णयास विलंब झाल्यास त्या उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत पुढे वाढवून दिली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून संयुक्‍त पूर्व परीक्षा गट-ब अंतर्गत 666 पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी 26 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा होणार आहे. त्यामध्ये पीएसआय, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) ही पदे भरली जाणार असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंतच आहे. राज्य सरकारने कोरोना संकटामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या 'एमपीएससी'ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एक वर्ष वाढीव संधी दिली आहे. मात्र, राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून ती 14 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा शासन निर्णय निघालेला नाही.

या पार्श्‍वभूमीवर शासन निर्णय कधी निघणार, या परीक्षेसाठी अर्ज करता येईल की नाही, असे प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. परंतु, उमेदवारांनी काहीच चिंता करू नये, सरकार त्यांच्या पाठीशी असून त्यांच्यासाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी या परीक्षेतच होईल, असा विश्‍वास भरणे यांनी व्यक्‍त केला. शासन निर्णयास विलंब लागल्यास, त्यांना पुढे अर्ज करण्याची मुदत वाढवून दिली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, उद्या (बुधवारी) होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शासन निर्णय निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यमंत्री भरणे म्हणाले...

  • संयुक्‍त पूर्व परीक्षा 'गट-ब'ची 26 फेब्रुवारीला परीक्षा

  • विधान परिषदेची आचारसंहिता असल्याने निघाला नाही वयोमर्यादा वाढीचा जीआर

  • 14 जानेवारीला आचारसंहिता संपणार; तरीही, उद्या (बुधवारी) निर्णय होऊ शकतो

  • एक वर्षाची वयोमर्यादा वाढणार हे निश्‍चित; जीआर निघायला विलंब झाल्यास उमेदवारांना मिळेल अर्जासाठी मुतदवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT