Mantralay maharashtra sakal media
महाराष्ट्र बातम्या

‘नमो शेतकरी महासन्मान’मधून वर्षाला ६००० मिळणार; पण ‘या’ ३ बाबींची पूर्तता बंधनकारक

महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना चार महिन्यांतून एकदा २ हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत ६ हजार रुपये मिळणार आहेत. मेअखेरीस राज्याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. मेअखेरीस राज्याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष असणार आहेत. दरम्या, आयकरदाते, सरकारी नोकदार, लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील. मात्र, पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे.

राज्यातील १२ लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी त्वरित त्यांचे बँक खाते (ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात) आधार व फोन नंबरशी लिंक करून घ्यावे; अन्यथा त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत.

वर्षाला लागतील १६६० कोटी

राज्य सरकारने केंद्राकडूनही राज्यातील शेतकरी लाभार्थींची माहिती मागविली आहे. केंद्र सरकारचा चौदावा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा पहिला हप्ता आता मेअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात जवळपास ८३ लाख लाभार्थी आहेत. वार्षिक एक हजार ६६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

...तरच मिळेल सन्मान निधीचा हप्ता

पीएम किसान योजनेतील लाभार्थीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थींनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी सलंग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे. मेअखेरीस तथा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

- सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी

‘शेतकरी महासन्मान’साठी ‘या’ बाबी बंधनकारक

  • - १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र

  • - सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल

  • - लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी

  • - बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT