बसमध्ये जाण्यासाठी रांग. maharashtra bus
महाराष्ट्र बातम्या

बस स्थानकांवर नाहीत सीसीटीव्ही कॅमेरे! स्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीत लाडक्या बहिणींचे दागिने लंपास; दोन महिन्यांत ३२ महिलांचे दागिने लंपास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे एसटीतून दररोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लाखोंच्या घरात आहे. स्थानकावर बस आल्यानंतर गाडीत चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील, पर्समधील दागिने चोरत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे एसटीतून दररोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लाखोंच्या घरात आहे. स्थानकावर बस आल्यानंतर गाडीत चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील, पर्समधील दागिने चोरत आहेत. दोन महिन्यांत सोलापूर शहर-जिल्ह्यात ३२ महिलांचे दागिने व अन्य ऐवज चोरीला गेला आहे.

महिलांना एसटी प्रवासात सवलत असल्याने सोलापूरसह ग्रामीणमधील विशेषत: बार्शी, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट येथील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळते. बसगाड्यांची वाट पहात थांबलेले प्रवासी बस आल्यानंतर बसायला जागा मिळावी म्हणून गडबडीने आत जाण्याचा प्रयत्न करतात. एकच दरवाजा असल्याने त्यावेळी बसच्या दरवाजाजवळ खूपच गर्दी होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण किंवा पर्समधील दागिने, रोकड लंपास करतात. पोलिसांना तपासात अनेकदा त्या चोर महिलाच असल्याचे आढळून आले असून तिकीट दरात ५० टक्के सवलत असल्याने त्यांच्याकडून असे प्रकार होतात, असे पोलिस सांगतात.

प्रवास अर्ध्यातून सोडून महिला पोलिस ठाण्यात

बस स्थानकांवरील अस्ताव्यस्तपणे थांबलेल्या गाड्या, गाड्यांची गर्दी आणि सीसीटीव्हीची अपुरी संख्या, यामुळे ती चोरी नेमकी केली कोणी, याचा शोध घ्यायला पोलिसांना अडचणी येतात. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास दोन-चार महिन्यानंतरही लागलेला नाही, अशीही उदाहरणे आहेत. अनेक महिलांना चोरी झाल्यानंतर पुढचा प्रवास थांबवून पोलिसांत जावे लागत आहे.

अहवाल पाठवूनही स्थानकांवर सीसीटीव्ही अपुरेच

स्वारगेट येथील बस स्थानकावर प्रवासी तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी राज्यातील सर्व बस स्थानकांवर सीसीटीव्ही बसविणे, महिला सुरक्षारक्षक नेमणे, पुरेशा प्रमाणात पोलिस नेमणे, अशा उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्यांनी प्रत्येक विभागांकडून अहवाल देखील मागविले, पण त्या अहवलावर कार्यवाही झालेली नाही. सोलापूरचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी म्हणाले, ‘प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दुप्पट सीसीटीव्ही बसविणे, सुरक्षारक्षक नेमण्यासंदर्भातील अहवाल पाठविला असून त्यावर पुढील महिन्यात निर्णय अपेक्षित आहे’.

पोलिस म्हणतात, पत्रव्यवहार करूनही कार्यवाही नाही

सोलापूरच्या मुख्य बस स्थानकावर वारंवार महिलांचे दागिने, साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. त्याठिकाणी दोन शिफ्टमध्ये आमचे अंमलदार नेमले आहेत. पण, बसमध्ये चढताना गर्दीत असे प्रकार होतात. तपास करताना सीसीटीव्हीचा अभाव असल्याचे दिसते. त्याअनुषंगाने विभाग नियंत्रकांना वर्षभरात तीनवेळा पत्रव्यवहार केला, पण काहीच कार्यवाही झालेली नाही.

- अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फौजदार चावडी पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

Bhorya Independence Day Speech Video : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोऱ्यानं केलं पुन्हा एक तुफान भाषण; सोशल माडियावर प्रचंड व्हायरल!

Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल! 'ही' लोकप्रिय गाणी वापरून 'Instagram Reels' वर होईल लाइक्सचा वर्षाव

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

SCROLL FOR NEXT